India Lockdown : आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक

Prateik Babbar On Smita Patil : हिंदी सिने-सृष्टीतील दिग्गज अभिनेते राज बच्चर यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) सध्या ‘इंडिया लॉकडाउन’ (India Lockdown) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रतीक बब्बर त्याच्या आईला म्हणजेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांना श्रद्धांजली वाहणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती ‘इंडिया लॉकडाउन’ या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात प्रतीक स्थलांतरित मजुराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान इंडिअन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला,”इंडिया लॉकडाउन’ या सिनेमाचा अभ्यास करताना मला माझ्या आईची खूप मदत झाली. आईने अशापद्धतीच्या अनेक भूमिका साकारल्याने मी तिचे अनेक सिनेमे पाहिले. तिच्याकडून मला खूप गोष्टी शिकता आल्या”. 


Reels

2 डिसेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

‘इंडिया लॉकडाउन’ हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात फूलमतीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

हेही वाचा :  आलियाने शेअर केलेल्या बाळाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ‘इंडिया लॉकडाउन’ या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. हा महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पार पडणार आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

संबंधित बातम्या

India Lockdown Trailer Out Now: ‘इंडिया लॉकडाऊन’ चा ट्रेलर रिलीज; सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर प्रमुख भूमिकेत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …