Goshta Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘गोष्ट एका पैठणीची’चा ट्रेलर आऊट

Goshta Eka Paithanichi : ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 68 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान मिळाला आहे. आता सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास उलगडणाऱ्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

‘गोष्ट एका पैठणीची’ सिनेमाचं कथानक काय?

प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्नं असतात, कोणाची सत्यात उतरतात, कोणाची नाही. त्या स्वप्नांचा पाठपुरावा प्रत्येक जण आपापल्या परीनं करतच असतो. आपली स्वप्नपूर्ती करतानाच्या या प्रवासात अनेक अनुभव येतात, काही चांगले असतात, काही कटू आठवणी देणारे. काही अनुभवातून आपला आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. असाच एक रंजक प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. 

ट्रेलरमध्ये काय आहे?

एक पैठणी असावी, इतकं साधं स्वप्न बाळगणारी इंद्रायणी, तिच्या स्वप्नांबाबत खूप सकारात्मक दिसत आहे. मात्र या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास खडतर दिसत आहे. तिचे पैठणीचे हे स्वप्न पूर्ण होईल का, की तिचा हा प्रवास तिला एका वेगळ्या वाटेवर नेणार? या प्रश्नांची उत्तरे ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळतील. सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य प्रवास आहे. 

हेही वाचा :  पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला... डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ

कलाकारांची मांदियाळी असेलेला ‘गोष्ट एका पैठणीची’!

‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमात कलाकारांची मांदियाळी आहे. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक आणि आदिती द्रविड हे कलाकार ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

Reels

‘गोष्ट एका पैठणीची’ सिनेमाविषयी दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणाला,”गोष्ट एका पैठणीची’ हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असं आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं.आमच्यासाठी हा सुखद अनुभव होता. आम्ही सगळ्यांनीच मनापासून काम केलं होतं आणि त्याचं चीज झाल्याचं समाधान वाटतं आहे”.

शंतनू पुढे म्हणाला,’गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाची गोष्ट आहे तुमच्या आमच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारी, ही गोष्ट आहे साध्या माणसांची, आशा- निराशेची, संस्कारांची. त्यामुळेच हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेतरी आपल्या जवळचा वाटेल. सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा सिनेमा आहे.”

संबंधित बातम्या

Goshta Eka Paithanichi : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा सातासमुद्रापार डंका; ‘गोष्ट एका पैठणीची’चा सिंगापूरमध्ये प्रिमीअर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …