लाइफ स्टाइल

BJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचेच दोन नेते आपापसात भिडल्याने राजकारणही तापलं  आहे. गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान या गोळीबाराचं सीसीटीव्ही आता समोर आलं आहे. या सीसीटीव्हीत पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं हे दिसत आहे. सीसीटीव्हीत दिसत …

Read More »

‘कोण कुठल्या पक्षाचा…’; Ganpat Gaikwad Shooting प्रकरणात फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Devendra Fadnavis First Comment: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. गणपत पाटील यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेचे राजकीय …

Read More »

भाच्याच्या मोबाईलवर प्रियकराचा फोन आला अन्… नगरमध्ये पत्नीने काढला पतीचा काटा

दत्तात्रय गडगे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ खून प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणात पत्नीच सुत्रधार असल्याचे समोर आल्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  30 जानेवारी …

Read More »

धुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण…; ‘त्या’ नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यामधील सावित्रीबाई फुले विद्यापिठातील ललित कला केंद्राच्या प्रमुखांसहीत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या नाटकावरुन तुफान राडा झाल्यानंतर पोलिसांनी आज अटकेची कारवाई केली आहे. ललित कला केंद्रात सादर करण्यात आलेल्या रामायणावर आधारित ‘जब वी मेट’ नावाच्या नाटकावरुन विद्यार्थी विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असा वाद …

Read More »

‘लग्नाच्या आश्वासनानंतर शरीरसंबंध ठेवले आणि..’, बलात्काराच्या आरोपीची मुक्तता; WhatsApp मुळे वाचला

Bombay High Court Decision On Sex Before Marriage Case: मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना लग्नाचं आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासंदर्भात महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. लग्नाचं आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवले आणि नंतर पालकांमधील मतभेदामुळे विवाह मोडल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. गौरव वानखेडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला आहे. …

Read More »

हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे …

Read More »

खिशाला फोडणी! टोमॅटोनंतर लसणाचे दर वाढले, एक किलोसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Garlic Price Hike News in Marathi : प्रत्येक स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ सहजतेने सापडतो. मुळात लसणाचा हा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण लसणाचे हेच महत्त्व कालांतराने कमी होताना दिसत आहे. कारण कांद्यानंतर लसणाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहातून लसणाचे फोडणी गायब झाली आहे. परिणामी शेतरकऱ्यांना लसून हसवतोय तर कांदा रडवतोय अशी …

Read More »

‘शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..’; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी

Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: कल्याण पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी आपले कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंकडे असल्याच्या दाव्यापासून ते शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे. उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख …

Read More »

‘..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही’; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान

Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad On Devendra Fadnavis: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेतील महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील भाजपा विरुद्ध शिंदे गट वाद …

Read More »

‘मी गोळीबार केला कारण…’, शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

Ganpat Gaikwad-Mahesh Gaikwad Kalyan Firing : कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख,तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोरच हा गोळीबार झाल्याचे बोललं जात आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली …

Read More »

मुंबईलगतच्या या शहरात शंभर टक्के दारूबंदी; 19 वर्षांपूर्वी ग्रामस्थानी घेतला होता निर्णय

Kharghar Liquor Free Zone: मुंबई लगतच्या या एका शहरात दारूविक्री बंद आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नवी मुंबईतील खारघर शहर हे असं एकमेव शहर आहे इथे शंभर टक्के दारुविक्री बंद आहे. गावकऱ्यांनी संघर्ष करत व लढा देत इथे दारुबंदी करुन दाखवली आहे. आज खारघर शहरात लोकवस्ती व आधुनिक सुविधा वाढत आहेत. खरघर एक अत्याधुनिक …

Read More »

विमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, ‘तसा काही…’

USA Dr. Sudipta Mohanty : अमेरिकेत विमानामध्ये हस्तमैथून करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय वंशाचे डॉक्टरबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत विमानामध्ये मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा भारतीय वंशाच्या डॉक्टरवरचा आरोप खोटा ठरला आहे. या प्रकरणात, भारतीय वंशाचे डॉक्टर विमानात एका किशोरवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळले नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे. 33 वर्षीय डॉक्टर सुदिप्ता …

Read More »

मुंबईकरांचा प्रवास समुद्राच्या पोटातून; 19 फेब्रुवारीला खुला होतोय सागरी किनारा मार्ग

Coastal Road Project: शिवडी-न्हावा सागरी सेतू अलीकडेच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुंबईचे रुपच बदलून टाकणाऱ्या या पुलाची सध्या चर्चा असतानाच आणखी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी खुला होतोय. सागरी किनारा मार्गाचा (कोस्टल रोड) पहिला टप्पा खुला होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे.   मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. …

Read More »

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला …

Read More »

‘मलाही ऑफर आल्या होत्या’, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, म्हणाले ‘इथंच मारीन…’

Raj Thackeray on Toll: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलवसुलीवरुन संताप व्यक्त केला आहे. माझा विरोध टोल नाही तर टोलवसुलीला आहे हे स्पष्ट करताना टोलवसुलीतून येणारा पैसा राज्य सरकारकडे जातो की खासगी व्यक्तीच्या खिशात याबाबत पारदर्शकता हवी असं राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान टोलच्या मुद्द्यावर आपण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट …

Read More »

‘भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच’ उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. कोकणातले सहा आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेले आहेत. त्यामुळे कोकणात नव्याने पक्षसंघटना बळकट करण्याचे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा त्यांचा दौरा असून या  दौऱ्यात उद्धव …

Read More »

‘….हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही’, राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray on BJP: राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करत आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी …

Read More »

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना समोर ठेवून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासाठीही रेल्वेच्या अर्थसंकल्पात 15 हजार 554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात मुंबई लोकलसह राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. तसंच, मुंबई लोकलबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.  अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी …

Read More »

‘थोडा विचार करा’, राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले ‘तुम्हाला एका अजेंड्याखाली…’

Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil) भेटायला गेलो तेव्हा हे होणार नाही असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. यामध्ये फार तांत्रिक बाबी आहेत. कोणतंही राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकणार नाही. केंद्राला प्रत्येक राज्याचा विचार करावा लागेल. ते काही इतकं सोपं नाही …

Read More »

Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भरधाव वाहनांमुळे अनेक अपघाच्या घटना रोज समोर येत असतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व देखील येतं. अशातच पुण्यातून अपघाताची अशीच एक भीषण घटना समोर आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक अपघाताची घटना एका …

Read More »