हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे उभारतात. मात्र भारताच्या शेजरी असाही एक देश आहे जिथे इस्लाम धर्माचे हजारो लोक वास्तव्यास आहेत मात्र तिथे त्यांना मशिदीमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य नाही. हा देश कोणता? इथे असा नियम का? कधीपासून आणि कसा अंमलात आणला गेला? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात…

कोणता आहे हा देश?

‘थंडर ड्रॅगनचा देश’ अशी ओखळ असलेल्या या देशामधील विकास हा सकल राष्ट्रीय आनंद म्हणजेच ‘जीएनएच’च्या माध्यमातून मोजला जातो. या देशाचं नाव आहे भूतान. बौद्ध धर्म हा येथील सर्वात प्रमुख धर्म आहे. हा धर्म या देशाला सांस्कृतिक वारसा आणि परंपरेतून मिळालेला आहे. येथील एक चतुर्थांश लोकसंख्या हिंदू, मुस्लीम, बॉन आणि ख्रिश्चन आहे. भूतानची लोकसंख्या 7.5 लाख इतकी आहे. यापैकी सर्वात मोठा घटक हा बौद्ध धर्माचं पालन करतो. येथील एकूण लोकसंख्येच्या 75 टक्के लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. तर एकूण लोकसंख्येपैकी 22.6 टक्के लोकसंख्या ही हिंदूंची आहे. बौद्ध आणि हिंदू या 2 धर्मांचं पालन करणाऱ्या लोकांची संख्या 97 टक्क्यांहून अधिक असल्याने या देशामध्ये बौद्ध मंदिरं आणि मठांबरोबरच हिंदू मंदिरांचीही बऱ्यापैकी संख्या आहे.

हेही वाचा :  Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?

केवळ 3 असे देश जिथं एकही मशीद नाही

आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी जगभरामध्ये ख्याती असलेल्या भूतान देशातील मुस्लिमांची संख्या ही 7 हजारांच्या आसपास आहे. भूतान हा जगातील असा केवळ तिसरा देश आहे जिथे एकही मशीद नाही. तर भारताच्या शेजारी असलेला आणि एकही मशीद नसलेला भूतान हा एकमेव देश आहे. भूतान प्रमाणेच मोनाको आणि स्लोवाकिया हे 2 असे देश आहेत जिथे एकही मशीद नाही. भूतानमध्ये मुस्लिम गैरबौद्ध धर्मियांबरोबर जाऊन आपल्या छोट्या कक्षांमध्ये प्रार्थना करतात. 

हिंदू या देशातील महत्त्वाचा धर्म; साजरे होतात सारे सण

भूतानच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. मात्र कोणत्याही पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना दारोदारी जाऊन आपल्या धर्माचा प्रचार करता येत नाही. सरकारने बौद्ध धर्मीय वगळता कोणत्याही धर्मातील लोकांना धार्मिक भवन उभारण्यावर बंदी घातली आहे. बौद्ध धर्माखालोखाल हिंदू धर्म हा भूतानमधील दुसरा प्रमुख धर्म आहे. याच कारणामुळे देशाच्या दक्षिण भागात फार मोठ्या संख्येनं हिंदू मंदिरं आणि प्रार्थनास्थळे आहेत. हिंदू वैदिक विद्यालये देशाातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंदू संस्कृती आणि परंपरांचं शिक्षण देतात. भूतानमध्ये हिंदू सणही साजरे केले जातात. यामध्ये दसऱ्याचाही समावेश आहे. दसऱ्याच्या दिवशी भूतानमध्ये सार्वजनिक सुट्टी असते.

हेही वाचा :  मोठी बातमी! मोदी सरकार देशाचं नाव बदलणार? राष्ट्रपती भवनाच्या 'त्या' पत्राची चर्चा

मूळ निवासी कोण?

भूतानमधील लोक वज्रयान म्हणजेच बौद्ध धऱ्मातील महायान शाखेचे अनुयायी आहेत. तिबेटी आप्रवासी आणि त्यांचे वंशज नगालोप बौद्ध वंशाचे असून त्यांची संख्या लक्षणीय आहे. ते भूतानच्या मध्य आणि पश्चिम भागांमध्ये राहतात. देशातील मूळ निवासी हे शारचॉप्स वंशाचे नागरिक आहेत. ते पूर्ण भूतानमध्ये वास्तव्यास आहेत. बौद्ध धर्मीयांचा पगडा देशावर असल्याचं देशातील कोणत्याही भागांमध्ये प्राकर्षाने दिसून येणारी बौद्ध प्रार्थनास्थळे, स्मारके, वास्तूकला आणि झेंड्यावरुन जाणवतं.

बौद्ध धर्माच्या प्रसाराआधी…

देशात बॉन समुदायाचे लोकही राहतात. ही भूतानमध्ये एक स्वदेशी ग्रामी तिबेटी धर्म पद्धती असून यांचा पूजेवर फार विश्वास असतो. बौद्ध धर्माच्या प्रसाराआधी भूतानमधील प्रमुख धर्म हाच होता. आजही भूतानमधील अनेक विद्वान आणि काही प्रांतातील लोक या पद्धतीचे अनुयायी आहेत. बॉनिझममध्ये पशू आणि नैर्गिक गोष्टींची पूजा केली जाते. त्यामुळेच अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत तसेच खास प्राण्यांना फार महत्त्व आहे. याच कारणामुळे नेपाळमध्ये ड्रॅगनला पवित्र मानलं जातं.

प्रार्थनेसाठी भारतात येतात

भूतानमधील मुस्लिम समाजाने 2008 साली भूतान-भारत सीमेवारील जयगावमध्ये एक मशीद उभारली होती. आजही भूतानमधील काही मुस्लीम येथे नमाज अदा करण्यासाठी येतात. भूतानमधील 1 टक्के लोकसंख्या ही रोमन कॅथलिक आहे. यापैकी बरेचसे लोक हे भूतानच्या दक्षिण भागात वास्तव्यास आहे. भूतानमध्ये 1627 साली ख्रिश्चन धर्म सर्वात पहिल्यांदा पोहोचला. पोर्तुगालचे एस्टेवाओ कॅसेला आणि जोआओ कॅब्राल तिबेटमध्ये जेसुइट मोहिमेअंतर्गत पोहचण्याचा प्रयत्न केला तेव्हा झाला.

हेही वाचा :  Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा झटका, होणार अटक?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …