ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान; PM नरेंद्र मोदींकडून भारतरत्न जाहीर

Bharat Ratna to LK Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत यांनी ही माहिती दिली आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आपण त्यांच्याशी बोललो असून, अभिनंदन केलं असल्याची माहिती नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारण्यात मोलाची भूमिका निभावली होती. प्राणप्रतिष्ठानेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत होते. त्यातच आता त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. 

“मला हे सांगताना फार आनंद होत आहे की लालकृष्ण अडवणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मी त्यांच्याशी याबद्दल बोललो असून त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जात असल्याबद्दल त्याचं अभिनंदनही केलं,” अशी माहिती नरेंद्र मोदींनी पोस्टमध्ये दिली आहे. 

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “आमच्या काळातील हे एक सर्वोत्तम नेते आहेत. भारताच्या विकासामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. तळागाळामध्ये कामाला सुरुवात करुन त्यांनी देशाचे उपपंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारली. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून ही काम पाहिलं. संसदेमध्येही त्यांनी मांडलेले मुद्दे हे नेहमीच परिपूर्ण, माहितीपूर्ण आणि वेगळेपण जपणारे ठरले”.

“अडवाणीजींची सार्वजनिक जीवनातील अनेक दशके चाललेली सेवा पारदर्शकता आणि सचोटीच्या अटल वचनबद्धतेने चिन्हांकित केली गेली आहे. त्यांनी राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय दर्जा निर्माण केला आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा बहुमान मानेन,” असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

हेही वाचा :  उपोषण थांबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत; संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …