IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या (बुधवार) पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळणार हे नक्की आहे. दरम्यान या मालिकेपूर्व, केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाले. ज्यांच्या जागी, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळालं आहे.
नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यात आता टी20 स्पेशलिस्ट संघासोबत भारताची गाठ आहे. त्यामुळे सावध पण आक्रमक खेळ करु भारताला विजय मिळवावा लागणार हे नक्की. दरम्यान सध्याच्या घडीला प्रेक्षकांचा आवडीचा प्रकार असणाऱ्या टी20 सामन्यांची मालिकाही जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
कुठे खेळवला जाणार सामना?
हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.
कधी खेळवला जाणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा पहिला टी20 सामना उद्या अर्थात 16 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (India’s T20I squad)
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, कुलदीप यादव
संपूर्ण टी-20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- 16 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
हे ही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
