ताज्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला ‘टाटा गुड बाय’, अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) उमेदवारीमुळं रायबरेली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अमेठीऐवजी (Amethi) यावेळी राहुल गांधींनी रायबरेलीतून (Rae bareli) मतदारसंघाची निवड केली. केरळमधील वायनाडपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. तर अमेठीतून काँग्रेसनं गांधी घराण्याचे विश्वासू के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिलीय. अमेठीऐवजी रायबरेलीची निवड करून काँग्रेस आणि राहुल गांधींनी सर्वांनाच …

Read More »

‘…मगच माविआचं सरकार पाडलं’, अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Tanaji Sawant On Ajit Pawar : महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पूर्वकल्पना देऊनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. मी जे काही बोलतो, ते करून दाखवतो. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांना कल्पना दिली अन् अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडलं, असा दावा तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये एका खासगी …

Read More »

प्रचारासाठी पॉवरफुल ‘पवार लेडीज’, लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात

जावेद मुलाणी, झी मीडिया : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Loksabha Constituency) हा राज्यातलाच नव्हे तर देशातलाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Aji Pawar) पहिल्यांदाच निवडणुकीत आमने सामने आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उमेदवार …

Read More »

Insurance Premium News : हेल्थ इन्श्युरन्स घेणाऱ्यांना मोठा झटका, 10 ते 15% वाढणार पॉलिसीचा प्रीमियम

Health Insurance Premium: तुमचा आरोग्य विमा असेल आणि त्याचे रिन्युअल जवळ आले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. विमा नियामक IRDAI ने नुकतेच नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम भविष्यात विम्याच्या हप्त्यावर दिसू शकतो. नवीन नियमानुसार, आता तुम्हाला इन्श्युरन्स दाव्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी ही …

Read More »

VIDEO: ‘…जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…

Priyanka Gandhi Speech Video : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात प्रचारसभांचीच गर्दी पाहायला मिळत आहे. देशस्तरावरील मोठे नेते महाराष्ट्रात असतानाच तिथं काँग्रेसची एक फळी प्रियंका गांधी सांभाळताना दिसत आहेत. जनमानसात जाऊन सामान्यांशी संवाद साधणाऱ्या याच प्रियंका गांधी मुरैना येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान व्यासपीठावर भावूक झाल्या आणि वडिलांच्या निधनासमयीचा तो कठीण प्रसंग आठवून त्यांनाही हुंदका दाटून आला.  प्रियंका यांचा …

Read More »

‘जर तुमच्यात हिंमत असेल, तर…,’ राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ टाळल्यानंतर PM नरेंद्र मोदींचं जाहीर आव्हान

LokSabha Election: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जाहीर आव्हान देत हिंमत असेल तर अमेठीत (Amethi) भाजपाचा सामना करा असं म्हटलं आहे. तसंच पराभवाच्या …

Read More »

‘कुटुंब संभाळता आलं नाही ते..’ मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, ‘कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..’

Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा उल्लेख पुण्यातील सभेमध्ये ‘भटकती आत्मा’ असा केल्यानंतर या प्रकरणावरुन नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता एका मुलाखतीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या कारकिर्दीसंदर्भात बोलतना पंतप्रधांनी शरद पवारांना कुटुंब संभाळता येत नाही तर ते महाराष्ट्र काय संभाळणार? असा सवाल उपस्थित करत टोला …

Read More »

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?

Loksabha Election 2024 : महाविकासआघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटासह मित्र पक्षातील मोठ्या नेत्यांनीही विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊतही यास अपवाद नाहीत. प्रचाराच्या रमधुमाळीदरम्यान राऊतांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेदरम्यान विरोधकांवर चौफेर टीकेची झोड उठवत सांगलीतील मतदारांविषयी आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविषयी विश्वासार्ह वक्तव्य केलं.  सांगलीत तिरंगी लढत करण्यात कोणाचे …

Read More »

Big News : राज्याच्या धान्य कोठारात तब्बल 541 कोटी रुपयांचं धान्य खराब होण्याच्या मार्गावर; काय आहे यामागचं कारण?

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: राज्यातच नव्हे तर, सध्या संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता महाराष्ट्रातील धान्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेच्या वतीनं विविध मागण्यां पूर्ण होईपर्यंत धान्य भरडाई बंद केली आहे. (Maharashtra News) गेल्या सहा महिन्यांपासून खरीप हंगामादरम्यान खरेदी केलेलं 24 लक्ष 77 हजार 996 क्विंटल …

Read More »

सोन्याला पुन्हा झळाळी; मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव वाढला, मुंबईतील दर जाणून घ्या

Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा गुरुवारी म्हणजेच 2 मे रोजी सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. वायदे बाजारात सोन्याच्या दरात 400 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळं सोन्याचा भाव 71,000 वर पोहोचला आहे. तर, चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. चांदी 50 रुपयांनी वाढून 80,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली आहे.  …

Read More »

स्त्रीधनावर पतीचा किती हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय सांगतो?

महत्त्वाचे मुद्दे Hindu Marriage Act : वैवाहिक नात्यासंदर्भात भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयानंही महत्त्वाची मतं नोंदवली आहेत. वेळोवेळी उच्च न्यायालयांच्या वतीनंही सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत राहत या निर्णय आणि आदेशांना पाठिंबा देण्यात आला आहे. न्यायालयानं लक्ष घातलेला असाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीधन. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय, स्त्रीधनावर कोणाचा अधिकार असतो, त्यावर पतीला दावा सांगता येतो का या आणि अशा काही प्रश्नांवर …

Read More »

असह्य डोकेदुखी, व्यायाम करताना खाली कोसळला; जिममध्ये 32 वर्षीय तरुणाने गमावले प्राण

Brain Stroke: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. जिममध्येच एका युवकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील सिद्धिगीरी परिसरात 32 वर्षांचा तरुण जिममध्ये व्यायाम करत होता. त्याचवेळी अचानक त्यांचे डोके दुखू लागले आणि तो खाली कोसळला. त्यानंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत समोर आली आहे.  समोर …

Read More »

Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी…; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi:  पक्ष फोडण्याचा जो आरोप केला जातोय. ते लोक काय दुध पिणारी मुलं आहेत का, असे पक्ष फोडता येतात का? शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले ते त्यांच्यात  अतिअहंकार व अतिमहत्त्वकांक्षेमुळं, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी यावर …

Read More »

‘भटकती आत्मा’च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले…

Sharad Pawar PM Modi News : लोकसभा निवडणुकीच्या  (loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या नेत्यांच्या सभा सुरु असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा मागे राहिलेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यातील एका जाहीर सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत नाव न घेता शरद पवार यांच्यासंदर्भात पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरित्या केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चांना सुरुवात …

Read More »

ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तर

Maharashtra News Today:  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत केला आहे. फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. 2022च्या सत्तास्थापनेवेळी नक्की काय घडलं? असा प्रश्न आता उपस्थित आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाला शिंदे गटाच्या आमदारांनेही दुजोरा दिला आहे. मात्र, ठाकरे गटाच्या आमदाराने हा …

Read More »

अरे देवा! कोकण रेल्वेवर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; ‘या’ ट्रेनचा होणार खोळंबा

Indian Railway : सुट्ट्यांचे दिवस आणि त्यातच प्रवाशांचा वाढणारा आकडा या गोष्टी लक्षात घेत भारतीय रेल्वेच्या वतीनं सुट्ट्यांच्या या माहोलात विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात येतो. भारतीय रेल्वे विभागाच्या या Vacation Special / Summer Special ट्रेनना प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. रेल्वे विभागाच्याच कोकण रेल्वे मार्गावर याची सातत्यानं प्रचिती येत असते. गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी …

Read More »

Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेचा यलो अलर्ट

Maharashtra Weather News : देश पातळीवर सध्या हवामानात असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना दिसत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये सुरु असणाऱ्या हिमवृष्टीचा थेट परिणाम देशातील मैदानी क्षेत्रांवर होताना दिसत आहे. परिणामी दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. पण, ही घट समाधानकारक नसेल ही वस्तूस्थिती. पूर्वोत्तर भारतात मात्र पावसाची …

Read More »

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना पदयात्रा.. एवढंच नाही तर बॅनर नाही अन् झेंडेही नाही. अपवाद वगळता पुण्यात निवडणूक असल्यासारखं कुठंच वाटत नाही. लोकशाहीचा महाउत्सव साजरा होत असताना पुणे जणू काही शांत शांत आहे. शहराच्या एखाद दुसऱ्या भागात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग दिसते. मात्र संपूर्ण शहरात म्हणावं तसं वातावरण (Pune …

Read More »

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला आहे. तसंच बॅनरवरुन उदय सामंत यांचं नाव हटवत किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरीत भाऊबंदकीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. किरण सामंत लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अद्यापही नाराज …

Read More »

‘…मग तर दाऊदही निवडणूक लढेल,’ दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, ‘तुम्हाला काय आम्ही…’

दिल्ली हायकोर्टाने ((Delhi High Court) अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. कोर्टाने याचिकेवर सुनावणीस नकार देताना याचिकाकर्त्याला खडेबोल सुनावले आहेत. ‘जर असं झालं तर, तर दाऊद इब्राहिम आणि कुख्यात गुन्हेगार राजकीय पक्ष निर्माण करुन निवडणूक लढतील आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करतील. बलात्कार आणि हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील …

Read More »