ताज्या

Pune Drugs Case : पुण्यातून 4000 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, सांगलीपासून थेट इंग्लंडपर्यंत कनेक्शन

Pune Drugs Case : गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचा मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केला आहे. पुणे, कुरकुंभ आणि दिल्लीपाठोपाठ सांगली जिल्ह्यातूनही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर छापा टाकून …

Read More »

World Thinking Day : गुंतवणुकीत विचार किती महत्त्वाचा? कधी आणि केव्हापासून सुरु झाला वर्ल्ड थिकिंग डे?

World Thinking Day : कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करणे आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप होणार नाही. ‘जागतिक विचार दिन’ (World Thinking Day) दरवर्षी 22 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे मुलींमध्ये आदर आणि महिला सशक्तीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.  वर्ल्ड असोसिएशन ऑफ गर्ल गाईड्स अँड गर्ल स्काउट्स …

Read More »

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर…

कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकात हिंदू मंदिरांच्या महसुलावर 10 टक्के कर लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. भाजपाने या विधेयकावर टीका केली असून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न …

Read More »

काय सांगता! ठाण्यात एका रात्रीत चक्क बस स्टॉपच चोरला, अन् सहा दिवसांनी…

Thane News Today: तुम्ही कधी बस स्टॉप चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? पण ही घटना चक्क मुंबईनजीकच्या ठाण्यात घडली आहे. ठाण्यात चक्क बस स्टॉपच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हे ऐकून तुम्हीही बुचकळ्यात पडलात ना? मात्र हे खरं आहे. तब्बल सहा दिवसांनंतर बा बस स्टॉप शोधण्यास यश आलं आहे.  नौपाडा पोलीस ठाणे परिसरातून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेला बस …

Read More »

टेन्शन वाढवणारी बातमी; जीव ओतून काम करूनही यंदा ‘इतकीच’ पगारवाढ

Salary News : सोशल मीडियावर सध्या काही रील सातत्यानं ट्रेंड करताना दिसत आहेत. हे रील आहेत पगारवाढ, Appraisals आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाचे. ‘एक अप्रेजल, पानी मे गयां… छपॅक…’ अशा ट्रेंडमध्येही ही वस्तुस्थिती मार्मिक स्वरुपात मांडली जात आहे. मुळात हे रील चेहऱ्यावर हसू आणणारे असले तरीही त्यामध्ये असणारी वस्तूस्थिती खरी आहे, हे आता स्पष्टच झालं आहे. तेसुद्धा आकडेवारीसोबत.  एका सर्वेक्षणानंतर …

Read More »

आता महाराष्ट्रातील McDonald’s मध्ये कधीच मिळणार नाही Cheese; कारण फारच धक्कादायक

McDonald’s Menu Issue: जगातील सर्वात मोठ्या चैन रेस्तराँपैकी एक असलेल्या ‘मॅकडोनॉल्ड’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘मॅकडोनॉल्ड’मधील पदार्थांमध्ये प्रत्यक्ष खरं ‘चीज’ न वापरता ‘चीज’सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा नुकताच खुलासा झाला. अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली. खरं चीज वापरत नसताना त्याचा उल्लेख पदार्थ विकण्यासाठी करणं हे नियमांना धरुन नसल्याचा ठपका अन्न व सुरक्षा आयुक्तांनी ठेवला. त्याच अनुषंगाने ‘मॅकडोनॉल्ड’ने एक …

Read More »

‘5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..’; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत

BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यान अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद झाल्याचं दिसून आलं आहे. आता पुन्हा या दोघांमधील बेबनाव जाहीरपणे समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झळकलेल्या एका पोस्टरमुळे दोघांमधील वाद सध्या चर्चेत आला असून हे पोस्टर्स भाजपाकडून लावण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. नक्की झालं काय? राज्याचे …

Read More »

‘तुमच्या मुलानं बलात्कार केलाय’, सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!

Nagpur Crime News : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक (Cyber Fraud Extortion) करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय. ”तुमच्या मुलाने बलात्कार केलाय, सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील..” असे फोन सध्या राज्यातील अनेक शहरातील तरुण मुलांच्या पालकांना सायबर भामट्यांकडून येतायत. त्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा देखील बसलाय. त्यामुळे नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) कठोर पाऊल उचललं …

Read More »

Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

Punjab Haryana border : हरियाणातील खनौरी सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू (A farmer was killed in firing) झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. तर हरियाणा पोलिसांनी असं काही झालं नसल्याचा दावा केलाय. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलण्याची घोषणा केली. पंजाबला हरियाणाशी …

Read More »

पुणे ड्रग्ज प्रकरण; एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड

Pune Drugs Case : पुणे तिथे ड्रग्ज नाही उणे असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण पुण्यात गेल्या तीन ते चार दिवसांत चार हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. दोन हजार किलो एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय.. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आलीय.  एमडी ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड उघड झाला आहे.  सर्वात …

Read More »

हुक्का बारवर बंदी, 21 वर्षाखालील मुलांना सिगारेट नाही, नियम तोडल्यास 3 वर्षींची शिक्षा…कायद्यात सुधारणा

Tobacco Ban : कर्नाटकमधल्या सिद्धारमैया सरकारने (Karnataka Government) मोटा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यात हुक्का बारवर पूर्णपणे बंदी (Hookah Bar Ban)घातली आहे. याशिवाय तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कायदा आणखी कठोर केला आहे. कर्नाटक विधानसभेत बुधवारी COTPA अॅक्ट म्हणजे सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सुधारित विधेयक विधानसभेने मंजूर केलं आहे. नव्या कायद्यानुसार नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा आणि …

Read More »

गुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना

Hadappa Sanskriti : सोनं शोधात खोदकाम करणाऱ्यांच्या हाती ऐतिहासिक खजाना लागला आहे. गुजरातमध्ये  हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत. हजारो वर्ष जुन्या हडप्पाकालीन संस्कृतीमधील हे दुर्मिळ अवशेष पाहून  पुरातत्वशास्त्रज्ञही चकित झाले आहेत. यामुळे हडप्पाकालीन संस्कृतीमधील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे. सध्या अनेक संशोधक येथे दाखल झाले आहेत.  गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक …

Read More »

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! जाणून घ्या उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांपैकी 17 जागांवर लढणार आहे. तसंच समाजवादी पक्ष उर्वरित 63 जागा लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा 2024 मध्ये पराभव करण्याच्या हेतूने झालेल्या इंडिया आघाडीची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच जागावाटपासंबंधी इतकी मोठी घोषणा करण्यात आली आहे.  रायबरेली आणि अमेठी (2019 …

Read More »

बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या लढत झालीच तर…; सुनेत्रा पवारांबाबत रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar On Loksabha Elelction: लोकसभेत बारामतीत नणंद-भावजय यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. अजितदादा पवार त्यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असून बारामती मतदारसंघातच सुप्रिया सुळेंविरोधात ही लढत होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार का, असा प्रश्न शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना केला असता त्यांनी …

Read More »

कोणत्याही हमीशिवाय मिळवा 3 लाखापर्यंत कर्ज, ‘ही’ योजना आहे तरी काय? जाणून घ्या

PM Vishwakarma Yojna 2024 in Marathi : 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना महाराष्ट्र या योजनेची घोषणा केली होती. देशातील कारागीर व शिल्पकार तसेच इतर सर्व पात्र नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे या योजनेला केंद्रीय मंडळाचे देखील मान्यता आहे. केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात लोकांना कर्ज देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. …

Read More »

विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना… असा झाला खुलासा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 600 किलो पेक्षा अधिक मेफॅड्रोनचा साठा (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आला आहे. 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे मेफेड्रोन पोलिसांनी (Pune Police) जप्त केलंआहे. विश्रांतवाडी इथल्या भैरवनगरमध्ये असलेल्या एका गोदामामधून 55 किलो, कुरकुंभ एमआयडीसीमधील ( MIDC) एका फॅक्टरीमधून 500 किलोच्या आसपास साठा करून ठेवण्यात आलेला …

Read More »

‘सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…’, मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Maratha Reservation: आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे लोकांशी संवाद साधाताना कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल असंही सांगितलं. आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख …

Read More »

शेतकरी आक्रमक! शंभू सीमेवर ‘आर या पार’ची लढाई लढण्याच्या तयारीत, केंद्राकडून पुन्हा चर्चेसाठी बोलावणं

Farmer Protest: दिल्लीच्या सीमेर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दल आणि पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनच्या आधारे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या डागल्या आहेत. पोलिसांकडून अश्रूधुराचा हल्ला करण्यात …

Read More »

‘एकनाथ शिंदेंनी महाराजांची खोटी शपथ घेतली…’ मराठा आरक्षणावरुन राऊतांनी डागली तोफ!

Sanjay Raut On Maratha Reservation: राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ‘सरकारने 10 टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रयत्न केला तो समाजाला अजिबात मान्य नाही. त्यांची फसवणूक झाली. सरकार त्यांचे समाधान करण्यास अयशस्वी झाले आहे,’ अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.  ‘भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे. आणि …

Read More »

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, ‘मी स्वत:..’

Sharad Pawar On INDIA Alliance Seat Sharing: राज्यसभेचे खासदार तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे कल पाहिल्यास लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागा ‘इंडिया’ आघाडी जिंकेल असं पवार म्हणालेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचंही पवारांनी …

Read More »