बंद पडलेल्या मराठी शाळा सुरु करण्यासाठी काय प्लान? दरेकरांचा सरकारला सवाल

Marathi School Closed: गेल्या १० वर्षाच्या काळात मराठी शाळा मोठया प्रमाणात बंद (Marathi School Closed) पडल्या असून या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government on Marathi School) काय पाऊले ऊचलणार ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Opposition Leader Pravin Darekar) यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मराठी नामांतराच्या मुद्द्यावरुन मुंबई पालिकेच्या शिक्षणविभागावर देखील टीका केली.

मराठी शाळांसाठी काय उपाययोजना?
पालिकेच्या शाळांमध्ये मराठी शिकणारा टक्का कमी होऊ लागला आहे. बहुतांश पालक पालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवून इतर मराठी शाळांना प्राधान्य देऊ लागले आहेत. मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची (Marathi School Student) संख्याही झपाट्याने कमी झाल्याचे वास्तव यावेळी मांडण्यात आले. एका बाजूला सरकार मराठी राजभाषासाठी कायदा करीत असताना दुसरीकडे मराठी शाळांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी आणि मराठी शाळा बंद पडू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार काय उपाययोजना करणार? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टात ७ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
हिंदी आणि उर्दू शाळांशी तुलना
मराठी शाळेचा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी हिंदी आणि उर्दू शाळांसोबत तुलना केली. हिंदी आणि उर्दू माध्यमाची पटसंख्या मराठीपेक्षा दुप्पट असल्याचे सांगत त्यांनी आकडेवारी जाहीर केली. हिंदी माध्यमांच्या २२७ शाळा असून त्यांची पटसंख्या ६३२०२ इतकी आहे. उर्दू माध्यमाच्या एकूण १९३ शाळा असून त्यांची पटसंख्या ६२५१६ इतकी आहे. तर मराठी माध्यमाच्या २८० शाळा असून त्यामध्ये केवळ ३३११४ विद्यार्थी शिक्षण घेतल असल्याची आकडेवारी दरेकर यांनी मांडली.

हेही वाचा :  JEE Main २०२२ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती, २८ हजारपर्यंत मिळेल पगार
मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांची आकडेवारी
वर्ष शाळा विद्यार्थी
२०१०-११ ४१३ १,०२,२१४
२०११-१२ ३९६ ९२३३५
२०१२-१३ ३८५ ८१११६
२०१३-१४ ३७५ ६९३३०
२०१४-१५ ३६८ ६३३३५
२०१५-१६ ३५० ५८६३७
२०१६-१७ ३२८ ४७९४०
२०१७-१८ ३१४ ४२५३५
२०१८-१९ २८७ ३६५१७
२०१९-२० २८३ ३५१८१
२०२०-२१ २८० ३३११४

High Paying Jobs: ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळेल सर्वाधिक पगार
मुंबई पब्लिक स्कूलचे नाव बदलण्याची मागणी
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकावर दरेकर यांनी भाष्य केले. मराठी भवन उभारणी, मराठी भाषा संवर्धन, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य या फक्त घोषणाच राहिल्या. यावेळी मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या मुंबई पब्लिक स्कूलचे नाव बदलण्याची मागणी दरेकर यांनी केली.

NTRO job 2022: ‘ही’ भाषा येत असेल तर परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, ४८ हजारपर्यंत पगार
ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी, ७० हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …