लागली पैज; या चित्रात काय दिसतंय सांगा, उत्तर सांगताच मिळेल…

मुंबई : काही संकल्पना अशा असतात ज्यांच्यासंबंधी आपण जसजसं अधिक जाणऊन घेतो, तसतसं त्यांच्यासंदर्भातलं कुतूहल आणखी वाढत जातं. या संकल्पना मग काही असू शकतात. Optical Illusion हे त्याचंच एक उदाहरण. वर दिसणारा फोटो ही ऑप्लिकल इल्युशनचंच उदाहरण आहे.

क्रिस्टो डोगोरोवनं तयार केलेलं हे इल्युशन. तुम्हाला या फोटोमध्ये नेमकं काय दिसतंय? झाडं, की त्वचा रुक्ष झालेले ओठ?

तुम्हाला जर यामध्ये झाडं दिसताहेत…

या चित्रात तुम्हाला जी गोष्ट पहिल्यांदा दिसते त्यामुसार तुम्हाला तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे गुणविशेष जाणून घेण्याची संधी मिळते. जर तुम्हाला या फोटोमध्ये सर्वप्रथम झाडं दिसली, तर तुम्ही मनमिळाऊ आणि खुल्या मनाचे व्यक्ती आहात.

दुसऱ्यांना काय वाटेल याची तुम्हाला बरीच काळजी असते. यावर तुमचं अधिक लक्षही असतं. मनातल्या भावना अनेकदा मनातच दडवून ठेवण्यात तुम्ही कुशल आहात. तुमच्याकडे खूप सारे मित्र आहेत पण, त्याचील सच्चे मित्र फारच कमी.

तुम्हाला यात झाडाची मुळं दिसताहेत का?

या चित्रात तुम्हाला झाडांची मुळं दिसत असल्यास तुम्ही निंदेकडेही सकारात्मकतेनं पाहता. स्वत:मध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करता. अनेकदा तुम्ही धीट स्वभावाचे आणि हट्टीही होता.

हेही वाचा :  Weather News : कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस; महाराष्ट्रापासून हिमाचलपर्यंत, काय आहेत थंडीचे तालरंग?

चित्रामध्ये तुम्हाला ओठ दिसले का?

चित्रात सर्वप्रथम तुम्हाला ओठ दिसल्यास तुम्ही शांत स्वभावाचे व्यक्ती आहात. सर्वसामान्य आयुष्य जगण्याकडे तुमचा कल आहे. काही लोक तुमच्याकडे कमकुवत असल्याच्या नजरेनं पाहू शकतात. पण, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वत:च्या अडचणींवर स्वत:च मात करण्यात यशस्वी ठरु शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …