‘राहुल गांधी यांचं आडनाव ‘खान’, ही फिरोज खानांची पिलावळ’ अभिनेते शरद पोंक्षे बरळले

निलेश वाघ, झी मीडिया,नाशिक : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी काँग्रेस नेते राहलु गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा उभा राहिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं खर आडनवा गांधी नाही, तर ‘खान’ आहे असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने (Independence Day) नाशिकच्या मालेगाव इथं भारतीय विचार मंचातर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकर यांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शरद पोंक्षे बरळले. अपील करायची संधी आहे तोपर्यंतम मै सावरकर नही गांधी हूं असं म्हणायचं. पण एकतर तू गांधीही नाहीस, अॅफिडेव्हिट करुन गांधी आडनाव घेतलं आहे. ओरिजनल आडनाव खान आहे. 

हे महात्मा गांधींचे वंशज नाहीत. त्या आडनावाचा यथेच्छ फायदा घेण्यासाठी त्याने हे आडनाव घेतलं आहे. ही फिरोज खानांची पुढची पिलावळ आहे. इतिहास आहे असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं आहे. गांधी आडनाव घेतलं तर या देशात मोठं होऊ शकतं हे माहित आहे, ही महात्मा गांधी यांची पुण्याई आहे, यांची नव्हे. त्यांच्या घराण्यााचा महात्मा गांधींशी काही संबंध नाही, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलंय, इतकंच नाही तर शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख मुर्ख असा करत मुर्खाला आपल्या आजीचाही इतिहास माहित नाही, सावरकरांचा कसा माहित असणार असा सवाल शरद पोंक्षे या्ंनी विचारला. 

हेही वाचा :  देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग, 35 तासांचा रस्ता 18 तासांत पूर्ण होणार, महाराष्ट्रालाही फायदा होणार

आज्जीने किती मोठा सन्मान केला आहे. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी देशातील पोस्टाच्या पहिल्या तिकिटावर सावकरांचा फोटो छापला, दादरला सावरकरांचं मोठं स्मारक उभारलं आहे असे दाखले यावेळी शरद पोंक्षे यांनी दिले. राफेल प्रकरणात सुध्दा राहुल गांधी यांनी सुप्रिम कोर्टात माफी मागितली,जो पर्यंत अपिल करण्याची संधी आहे तो पर्यंत हे कोर्टात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले अशी टीकाही शरद पोंक्षे यांनी केलीय.

जीवाधार सेवक संघाच्या वतीनं आयोजित सावरकर यांच्यावरील नाटकांची मालिका नाशिक शहरात तीन दिवस सादर करण्यात येतेय. या कार्यक्रमासाठी नाट्य कलाकार शरद पोंक्षे नाशकात आले आहेत, यावेळी पोंक्षे यांनी माध्यमांवर आगपाखड केली, मी माध्यमांशी बोलणार नाही असंही ते म्हणाले

नथूराम गोडसे पुन्हा रंगमंचावर
शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं होतं. या नाटकाला प्रचंड विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे. शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची घोषणा केली आहे. 

हेही वाचा :  वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही …

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …