Breaking News
  • Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू
  • आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा
  • Amazon Great Indian Festival 2023 सेल या दिवसापासून होणार सुरू, यावर भरघोस ऑफर्स
  • Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस
  • “शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

MUHS: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात आता ‘ग्रीन कॅम्पस’

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये ग्रीन कॅम्पस उपक्रमाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी श्रमदान करून विद्यापीठ परिसर हरित व सुंदर करणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी याबाबत बोलताना सांगितले, की वृक्षारोपण व जलसंधारण उपक्रमासाठी विद्यापीठ परिसर अत्यंत अनुकूल आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आणि श्रमदानातून सुरू झालेल्य या उपक्रमात विविध औषधी वनस्पतींची लागवड, वॉकिंग ट्रॅक आदींचा समावेश राहणार आहे. विद्यापीठ परिसर सुंदर, स्वच्छ व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हरित परिसर हे एक पाऊल आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यापीठाकडून सर्वांना देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्यांचा सहभागामुळे ‘माझे झाड, माझा परिसर, माझे विद्यापीठ’ ही भावना वाढीस लागण्यास मदत होईल.

…या बाबींचा आहे अंतर्भाव

या उपक्रमात विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती, सौरऊर्जेचा वापर, जलसंधारण, प्राणी व पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवासाचे जतन या महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे गट तयार करण्यात आले असून, नेमून दिलेल्या जागेत व वेळेत स्वेच्छेने श्रमदानातून विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस उपक्रम यशस्वी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस उपक्रमात विद्यापीठातील सहाशे अधिकारी व कर्मचारीऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

हेही वाचा :  MUHS: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाइन

Vaccination Drive: ‘या’ विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम

कमी किंमतीत घर बांधणी शक्य, IIT Madras कडून तंत्राचे संशोधन
UGC NET निकालासंदर्भात यूजीसीकडून अधिकृत अपडेट, जाणून घ्या

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Electronics Corporation of India Limited Invites Application From 484 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible …

वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अंतर्गत जुनिअर रिसर्च फेलो पदांची भरती

Vehicle Research and Development Establishment Invites Application From 09 Eligible Candidates For Junior Research Fellow …