प्रवेश पत्रावर उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखांची नोंद असेल. कॉल लेटर डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा –
आयबीपीएस एसओ साक्षात्कार प्रवेश पत्र २०२१-२२ अशा पद्धतीने डाऊनलोड करा
– ibps official website ibps.in वर जा.
– होमपेज वर, ‘Click here to download Interview Call Letter for Recruitment of Specialist Officers’ या लिंक वर क्लिक करा.
– लॉग इन करण्यासाठी आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा.
– आता SO Interview Call Letter स्क्रीन वर दिसेल.
– याची एक कॉपी डाऊनलोड करा आणि प्रिंट करा.
IBPS SO Interview Admit Card 2021-22 डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
१५ फेब्रुवारीला जाहीर झाला मुख्य परीक्षेचा निकाल
उमेदवारांना सल्ला दिला जातो की आयबीपीएस एसओ मुलाखतीचे प्रवेश पत्र २०२१-२२ वरील सर्व सूचना, माहिती काळजीपूर्वक वाचा. प्रवेश पत्रात चूक असल्यास परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेला माहिती द्या. आयबीपीएस एसओ मेन्स परीक्षेचा निकाल १५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. या भरती परीक्षेच्या सर्व अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.