या तेलांचा वापर करा
केसांना मसाज करणे ही आपली परंपरा आहे. त्यामुळे तुमची सेल्फकेअर करताना केसांना मसाज नक्की करा यामुळे तुमच्या केसांना मनाल आणि शरीराला आराम मिळतो. यासाठी तुम्ही कांसाची वाटी आणि दुहेरी बॉयलर पद्धतीने तेल गरम करा, ज्यामुळे औषधी वनस्पती सक्रिय होतात आणि केसांच्या मुळांमध्ये तेलाचा प्रवेश होतो. केसांचे विभाजन करून तेल लावा आणि नंतर रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि टाळूला आराम देण्यासाठी बोटांच्या हालचालींनी स्कॅल्पला मसाज करा. किमान ४५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर शॉम्पूने केस धूवा.
(वाचा :- Lemon Water : वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिताय? पण ते पिताना या चुका करू नका नाहीतर त्वचेवर होतील वाईट परिणाम)
हेअर मास्क
केस सुंदर होण्यासाठी हेअर मास्क मदत करते. तुमच्या स्वयंपाकघरातील DIY हेअर मास्कचा वापर करा. यासाठी ½ कप एलोवेरा जेलमध्ये 1 चमचे एरंडेल तेल मिसळा आणि आपल्या टाळूला लावा. रात्रभर सोडा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवा. त्याच प्रमाणे तुम्ही यासाठी जास्वंदाच्या फुलाच्या लगद्यामध्ये मेथीच्या दाण्यांसोबत ठेचूनही वापरू शकता, 15-20 मिनिटे लावा आणि नेहमीप्रमाणे धुवा.
(वाचा :- Lemon Water : वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिताय? पण ते पिताना या चुका करू नका नाहीतर त्वचेवर होतील वाईट परिणाम)
कोंड्याची समस्या
डोक्यात कोंडा निर्माण होणे ही फारच सामान्य समस्या आहे. यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करु शकता. यामुळे तुमची केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईलच त्याच प्रमाणे तुमच्या केसांतील कोंड्याची समस्याही कमी होईल.
(वाचा :- Vaginal hair : ‘नाजूक भागातील’ केस काढताना या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या, इन्फेक्शनला चार हात लांब ठेवा)
गरम पाण्याने केस कधीही धुवू नका
आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये केसांच्या काळजीच्या काही टिप्स नमूद केल्या आहेत यामध्ये गरम पाण्याने केस कधीही धुवू नका असे सांगण्यात आले आहे. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही केस थंड किंवा सानान्य तापमानाच्या पाण्याने धुवू शकता.
(वाचा :- Beauty tips सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर क्रिमचा थर लावू नका, आहारात करा या ५ गोष्टींचा समावेश )
उपकरणांचा वापर टाळा
केस सुकविण्यासाठी किंवा हेअर स्टाईल करण्यासाठी उष्णता देणारी उपकरणे वापरणे टाळा. यामुळे केसांना त्रास होतो. केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ देणे. त्याच प्रमाणे केस ओले असताना कंगवा फिरवू नका. केस धुण्यापूर्वी केसांना तेलाची मलिश करा.
(वाचा :- Night Skin Care: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही भन्नाट गोष्ट, एका रात्रीत चेहऱ्यात येईल बदल)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या