जाड पापण्या हव्या असतील तर एरंडेल तेल लावा, डॉक्टरांनी सांगितल या व्हायरल गोष्टी मागील सत्य

सौंदर्य वाढविण्यासाठी डोळ्याची फार मोठी भूमिका असते. त्यासोबत डोळ्यांचं सौंदर्य खुलविण्यात डोळ्यांच्या पापण्यांचं मोठे योगदान असते. परंतु जर तुमच्या पापण्या दाट नसतील तर, त्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी काही घरगुती उपाय केल्यास तुमच्या पापण्या दाट होण्यास मदत होऊ शकते.

या उपायांमध्ये एरंडेल तेलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. पण हे तेल लावणं खरंच योग्य आहे का? एरंडेला तेलाच्या वापराने केसांची चांगली वाढ होते. पण यामुळे पापण्यांना फायदा होईल का चला तर मग त्वचातज्ञ डॉ आंचल यांच्याकडून जाणून घेऊयात या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे.
(फोटो सौजन्य :- टाइम्स ऑफ इंडिया)

डॉ आंचल यांच्याकडून जाणून घेऊयात एरंडेल तेलाचे फायदे

मॉइश्चरायझर म्हणून वापर

एरंडेल तेलाच्या गुणधर्मामुळे त्याचा वापर आपल्याला एखाद्या मॉइश्चरायझर सारखा करता येईल. त्याच प्रमाणे एखाद्या जखमेला मलमपट्टीसाठी देखील एरंडेल तेलाचा वापर करण्यात येतो.

(वाचा :- सनस्क्रीन लावताना कुठं तुम्ही या चुका तर केल्या नाहीत ना!, जाणून घ्या डॉक्टरांचे मत)

कोंडा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त

एरंडेल तेलमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे केसात तयार होणारा बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे कोंडा नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

(वाचा :- या ५ सवयींमुळेच होतात तुमचे ओठ काळे, आजच सोडा या सवयी)

एरंडेल तेलचा फायदा

एरंडेल तेलमुळे केसांची चांगली वाढ होते. केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. ते अधिक जाड आणि गडद दिसतात. केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. पण या तेलामुळे पापण्या वाढण्यास मदत होत नाही.

(वाचा :- Hair Oils for Baldness : पुरूषांनो, कधीच पडणार नाही टक्कल आणि गेलेले केसही येतील परत, ताबडतोब लावायला घ्या ‘ही’ हेअर ऑइल्स..!)

एरंडेल तेल पापण्या वाढतील का?

तर डॉ आंचल यांच्या मते तसे होत नाही एरंडेल तेल पापण्यांच्या जळजळ आणि कोरड्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे जळजळ कमी करण्यास मदत करू शकते परंतु उपायाने पापण्या दाट होणार नाही. पापण्यांची लांबी आणि घनता अनुवांशिकतेवर आधारित असते.

(वाचा :- Hair Growth Tips : सर्व प्रयत्न करूनही तुमचे केस वाढत नाहीत? वैतागून जावू नका, हे घरगुती उपाय करून पाहा फरक)

पापण्या लांब आणि गडद करण्यासाठी तुम्ही काय कराल

डॉ आंचल यांच्या मते प्रोस्टॅग्लॅंडिन (Prostaglandin)अॅनालॉग्सच्या मदतीने तुम्ही पापण्यांना लांब करू शकतात. पण नेत्ररोगतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर ते नेहमी वापरा. दीर्घकाळ वापरल्यास पापण्या काळ्या होण्याची शक्यता असते.

(वाचा :- स्प्लिट एंड्सने केसांची वाढ थांबली आहे? मग तज्ञांनी सांगितलेले हे उपाय करुन पाहाच)Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या तारखेनंतर होणार !

मुंबई : Maharashtra cabinet expansion soon: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची …

Optical Illusion : ‘मास्टरमाइंड’ असाल तर, शोधा बेडजवळ दिसणारी मांजर

Optical Illusion Viral Photo:  ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होणारे फोटो …