अमिताभ बच्चनना झाला कॅलस आजार, तळव्यांच्या या आजाराने भयंकर वेदनेत, यामागची 5 कारणं व उपाय?

Amitabh Bachchan Suffered Callus : आता काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बरगडीला दुखापत झाली होती. ‘Project K’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना ही दुखापत झाली. पण आता मात्र त्यांना आणखी एक वेदनादायक समस्या भेडसावत आहे, ज्याला ‘Calluses’ म्हणतात. TOI च्या बातमी नुसार, ‘बिग बी’ यांनी 19 मार्च रोजी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, “बरगड्यांचे दुखणे सुरूच आहे. पण पंजाच्या समस्येमुळे बरगड्यांपेक्षा जास्त वेदना होऊ लागल्या आहेत.”

त्यांनी ब्लॉगमध्ये सांगितले की, कॅलसच्या खालच्या बाजूस एक जखम देखील तयार झाली आहे, ज्यामुळे समस्या अजून जास्त वाढली आहे. आपल्यापैकी अनेकांना या समस्येबद्दल माहिती असेलच, ही समस्या कोणालाही सतावू शकते आणि हो, यावर उपाय देखील केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य : Instagram/amitabhbachchan)

वेदना कमी करण्यासाठी केला हा उपाय

वेदना कमी करण्यासाठी केला हा उपाय

अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, त्यांनी कॅलसचे दुखणे कमी करण्यासाठी कोमट पाण्यात पाय बुडवण्याचा उपाय वापरून पाहिला, पण तो उपाय देखील कुचकामी ठरला. आता त्यांना इतक्या भयंकर वेदना होत आहेत की आयुष्यात त्यांनी एवढ्या वेदना कधीच अनुभवल्या नव्हत्या.
(वाचा :- Liver Damage: पोटाच्या या भागावर स्पर्श करून ओळखा लिव्हर झालं खराब, ही 9 लक्षणं दिसल्यास ताबडतोब करा हे 5 उपाय)​

हेही वाचा :  Roti For Weight Loss : पोट व कंबरेवरची चरबी कमी करते 'या' पिठापासून बनलेली चपाती, 1 आठवड्यातच दिसू लागेल कमालीचा फरक!

एका रात्रीत वाढली समस्या

एका रात्रीत वाढली समस्या

अमिताभ बच्चन यांना रातोरात कॅलसखाली फोड आला. वास्तविक, हे कॅलसकडे दुर्लक्ष केल्यामुळेच होते. अशा स्थितीत कॅलस मध्ये संसर्ग होऊ शकतो आणि पू देखील भरू शकतो. चला जाणून घेऊया पायाला असे फोड का येतात?
(वाचा :- भारतावर H3N2 व COVID-19 चा डबल अटॅक, डॉक्टरांची चेतावणी – 5 पद्धतींनी लक्षणांतील फरक ओळखून लगेच करा हे 8 उपाय)​

कॅलस नक्की आहे तरी काय ?

कॅलस नक्की आहे तरी काय ?

कॉर्न वा कॅलस हा एक त्वचेचा एक जाड आणि कडक पॅच आहे. जो तुमच्या शरीरात कुठेही निर्माण होऊ शकतो, परंतु तो पायांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात तयार होतो. कॅलसची त्वचा जाड, लहान आणि गोलाकार असते. तसेच कॅलस हा कडक त्वचेचा खडबडीत पॅच म्हणून देखिलो ओळखला जातो. सामान्यत: हे फोड दुखत नाहीत किंवा त्याला वेदना होत नाहीत, परंतु काहीवेळा संसर्ग झाल्यास अत्यंत वेदना होऊ शकतात. हीच गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या सोबत झाली.
(वाचा :- डायबिटीजचे दुश्मन आहेत नैसर्गिक इन्सुलिन वाढवणारी ही 5 ड्रिंक्स, कितीही गोड खाल्लं तरी वाढतच नाही Blood Sugar)​

हेही वाचा :  'बापाला कधी...'; 85 वाल्यांनी थांबले पाहिजे म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

कॅलसची कारणे

कॅलसची कारणे

आता तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की कॅलस नेमके का तयार होते. त्यामागची कारणे काय? तर मंडळी अनवाणी चालणे, घट्ट शूज किंवा हाय हिल्स परिधान करणे, सैल शूज घालणे, मोजे न घालणे,
जास्त चालणे किंवा स्पोर्ट्स एक्टीव्हीटीमुळे वाढलेला प्रेशर या सर्व कारणांमुळे कॅलसची समस्या निर्माण होऊ शकते.
(वाचा :- हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल व ट्राईग्लिसराईड एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर, खा हे बाराही महिने मिळणारं फळ)​

कॅलस होऊ नये म्हणून काय करावे?

कॅलस होऊ नये म्हणून काय करावे?

कॅलस होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. जसे की आरामदायक शूज घाला, पायाची काळजी घ्या, तळवेनीट घासा आणि स्वच्छ ठेवा, तळवे-पंजे किंवा जाड त्वचेच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेदना झाल्यास त्वरित डॉक्टररांचा सल्ला घ्या आणि गरजेचे असल्यास उपचार घ्या. जर कॅलस झाले असेल तर तुम्ही काहीश्या गरम पाण्यात पाय टाकून स्क्रबिंग करून ही समस्या दूर करू शकता. पण तरी फरक पडला नाही तर मात्र ऑपरेशनचा पर्याय निवडावा लागू शकतो.
(वाचा :- 24 वर्षीय शिंवागी जोशीला Kidney Infection, दिसली ही 8 लक्षणं, अभिनेत्रीचा हा सल्ला खूप महत्त्वाचा आणि इशा-याचा)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  ‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …