गुवाहाटीला गेलो म्हणून…. मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा

प्रणव पोळेकर, झी मिडिया रत्नागिरी : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) बंडाळी करत महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) मोठा भूकंप केला. बंडखोरीनंतर 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरतला(surat) गेले. यानंतर त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. यामुळे गुवाहाटी शहर चर्चेत आले.  शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… या फेसम डायलॉगमुळे गुवाहाटी अजूनही चर्चेत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील आता गुवाहाटीचीच नाव घेत त्यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे.  

उदय सामंत थेट गुवाहाटीत दिसले

शिवसेनेतून आमदार फुटत असताना उदय सामंत देखील अचानक संपर्क क्षेत्राबाहेर गेले. यानंतर काहीच तांसात उदय सामंत थेट गुवाहाटीत दिसले. एकनाथ शिंदे स्वत: त्यांना एअरपोर्ट रिसीव्ह करण्यासाठी आले. यानंतर उदय सामंत देखील शिंदे गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी रातोरात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार(Maha Vikas Aghadi Government) कोसळले. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार(Shinde-Fadnavis Government) अस्तित्वात आले.

हेही वाचा :  Sanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत

पहिल्याच मंत्री मंडळात उदय सामंत यांना स्थान मिळाले

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच मंत्री मंडळात उदय सामंत यांना स्थान मिळाले. उदय सामंत यांना उद्योग मंत्रीपद देण्यात आले. यानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. यावेळी उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद(Guardian Minister of Ratnagiri District) देण्यात आले. 

गुवाहाटीला गेलो म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो 

उदय सामंत यांनी विविध मंत्री पदे भूषवली आहेत. मला पालक मंत्री व्हायला साडेसात वर्षे लागली. गुवाहाटीला गेलो म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो असे उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत यांनी रविवारी खेड औद्योगिक वसाहतीत उद्योग भवन येथे उद्योजकांना मागगर्शन केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबात वक्तव्य केले. 

एखाद्या कारखान्यात अपघात झाला तर, त्याच्या परिवाराला मदत द्या असे निर्देश उदय सामंत यांनी कारखाना मालकांना दिले आहेत. तसेच वेदांता गेला तरी त्याही पेक्षा जास्त रोजगार रोजगार निर्माण करण्याची क्षमता  लोटे एमआयडीसीकडे आहे. त्यासाठी सर्व सहकार्य करू असे आश्वासन उदय सामंत यांनी उद्योजकांना दिले.  

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …