मोर लांढोऱ्यांचा शिकारी मुद्देमालासह जाळ्यात


कराडजवळ वनविभागाची कारवाई

कराड : राष्ट्रीय पक्षी दोन मोरांसह  सात लांढोऱ्यांची शिकार करणारा शिकारी वनविभागाच्या जाळ्यात मुद्देमालासह रंगेहाथ अडकला. फसकीच्या साह्याने मोरांची शिकार करणाऱ्या गोरख राजेंद्र शिंदे ( सध्या रा. रेठरे बुद्रुक ता.कराड. मूळ रा. इटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) याला वनविभागाने शिकार केलेले दोन मोर व सात लांढोरे यांच्यासह ताब्यात घेतले आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आटके ( ता. कराड ) येथील खटकुळी नावाच्या परिसरात कृष्णा नदीच्या दक्षिण बाजूस विक्रम पाटील यांच्या शेतात आरोपी गोरख राजेंद्र शिंदे हा फसकीच्या साह्याने शिकार करत खबर मिळाली. यावर सहाय्यक वन संरक्षक महेश झांजूर्णे, मलकापूर वनपाल ए पी सव्वाखंडे, पोलीस पाटील योगेश बेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने खटकुळी सावराई शिवारात धाड टाकून गोरख राजेंद्र शिंदे याला मृत दोन मोर व सात लांढोरे यांच्यासह ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील मोटारसायकल, भ्रमणध्वनी संच जप्त करून त्याच्यावर वन्यजीव  संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास साताऱ्याचे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दरम्यान, शिकार करणाऱ्यांची माहिती हॅलो फॉरेस्ट 1926 या टोल फ्री क्रमांकावर कळवण्याचे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा :  टॉपचे क्राइम रिपोर्टर, २९ व्या वर्षी संपादक...संजय राऊतांबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

The post मोर लांढोऱ्यांचा शिकारी मुद्देमालासह जाळ्यात appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- ‘डॉक्टर से कम समझे क्या!’

Viral Video : देशातील कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला आजी आजोबासह अनेक चिमुकले पोरं चंदन …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …