वीजप्रश्न : स्वाभिमानी शेतकरी संघटना ४ मार्चला राज्यभर करणार चक्काजाम आंदोलन


“सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल” राजू शेट्टींनी दिला इशारा

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता अधिक आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ४ मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामीण भागात राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (बुधवार) कोल्हापूर येथे केली.

“शेतीला दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी मागील ९ दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. अद्याप महावितरणला जाग आली नाही. आंदोलनाचा दुसरा टप्पा ४ मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामधून सरकारने तोडगा नाही काढला तर आंदोलन व्यापक होईल.”, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

उर्जामंत्र्यांशी फोनवर चर्चा –

“ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचा आजचं दुरध्वनीद्वारे संपर्क झाला. चर्चा का करत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलन सुरू ठेवून चर्चा करण्याची तयारी जिल्ह्यातील मंत्र्यांना कळवली होती. त्यांनी ऊर्जामंत्र्यांना काय सांगितले हे माहिती नाही. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, असेही त्यांना सांगितले आहे.” अशी माहिती शेट्टी यांनी दिली. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जयकुमार कोले, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर संभूशेटे उपस्थित होते.

हेही वाचा :  “जेवढा हे केंद्रातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील..”, आदित्य ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …