खरा रोमान्स म्हणजे काय? सुधा मूर्तींच्या या टिप्स पालकांनी मुलांशी नक्की शेअर कराव्यात

कारण प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी चांगला विचार करत असतात. मुलांच सगळं चांगलच व्हावा हा त्यांचा विचार असतो. पण अगदी पौडांगवस्थेत आल्यामुळे मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. याच वयात मुलं पहिल्यांदा प्रेमात पडतात. आता प्रेम होण्याची वयोमर्यादा मात्र कमी झाली आहे. अगदी शाळांमध्ये मुलं आकर्षणाला भुलतात अशावेळी पालकांनी सुधा मूर्तींनी सांगितलेल्या मुद्यांची मदत घेऊन पालकांशी संवाद साधणे गरजेचे आहे.

सुधा मूर्ती यांनी जीवनात नियोजित गोष्टींपेक्षा वेगळ्या प्रकारे उलगडणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तरुणांनी कसे तयार असले पाहिजे याविषयी सूचनाही शेअर केल्या. सुधा मूर्ती यांनी अलीकडेच तरुणांसाठी प्रणय विषयी पॉईंटर्स शेअर केले आहेत ज्यात नातेसंबंध असण्याचा अर्थ काय आहे आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर कसे वर्चस्व गाजवू नये हे स्पष्ट केले आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​रोमान्स हा जीवनाचा भाग आहे, जीवन नाही

सुधा मूर्ती म्हणतात की, रोमान्स हा जीवनाचा एक भाग आहे. पण पुढे जाऊन त्या हे ही सांगतात की, जीवनापेक्षा ते मोठे नाही. प्रेम, आकर्षण यासारखे मोहक क्षण सगळ्यांच्या जीवनात येतात. पण त्यामध्ये अडकून राहू नका. आयुष्याचं ध्येय काय आहे हे समजून घ्या. कारण रोमान्स हा जीवनाचा फक्त एक भाग आहे.

हेही वाचा :  मुलांना नम्रपणा शिकवायचा असेल तर सुधा मूर्तींनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा

(वाचा – Meta ने आईला जॉबवरून काढलं, ६ वर्षांच्या मुलीने साजरा केला आनंद, आई-मुलीचं खास नातं))

​पालकांसोबत तुम्ही सुरक्षित असतात

मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आपण सुरक्षित आहोत. आपली काळजी घेतली जाते आपल्या गरजा पूर्ण होत आहेत. सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने होत आहेत, असं वाटत असतं. पण हे होत नसून हे करणारे दोन व्यक्तिमत्व तुमच्यासोबत असतात ते म्हणजे आई-बाबा. आई बाबा या दोघांमुळे सुरक्षित आयुष्य जगत असता. असं असताना मुलांनी कोणताही निर्णय घेण्याआधी पालकांचा विचार करायला हवा.

(वाचा – ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी))

​जेव्हा डेट करत असता

जेव्हा कपल एकमेकांना डेट करत असतात. तेव्हा ते प्रेमात आकंठ बुडालेले असतात. दिवसातील काही तास तुम्ही भेटता. तेव्हा तुम्ही एकमेकांना आपल्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करता. जर एखादी चूक झालीच तर तुम्ही ती मोठ्या मनाने माफ देखील करता. पण जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवनाला सामोरे जात असता. तेव्हा तुम्हाला कुठेच सवलत मिळत नाही. जोडीदाराला आहे तसा स्विकारण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे जीवनाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि हे पालकांनी मुलांना आपुलकीने शिकवलं पाहिजे.

हेही वाचा :  Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

(वाचा – रोहित पवार यांच्या मुलांच्या नावात झळकतोय साधेपणा, तुम्हालाही भावतील ही नावे)

सुधा मूर्ती यांच्या तरूणाईला टिप्स

​अपयशही पचवलं पाहिजे

अपयश हे फक्त करिअर आणि शिक्षणातच असतं, असं नाही. प्रेमातही मुलांना अपयश येतं. अशावेळी पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. आपल्यासाठी जे उत्तम आहे ते आपल्याला मिळणारच ही भावना मुलांमध्ये पालकांनी रुजवली पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा नकारही पचवणे गरजेचे आहे. प्रेम ही भावनाच निरपेक्ष असणे गरजेचे आहे. जसं आई-बाबा आपल्यावर प्रेम करतात कोणतीही अपेक्षा न करता अगदी तेच खरं प्रेम आहे. क्षमा करणे ठीक आहे, विसरणे चांगले आहे, परंतु ते मागे सोडून पुढे जाणे हे सर्वोत्तम आहे, असं सुधा मूर्ती सांगतात. हा विचार पालकांनी मुलांना सांगितला पाहिजे.

(वाचा – अभिनेत्रीच्या तीन मुलांचे ३ बाप, तिघांसोबत राहून मुलांचे करते संगोपन… काय आहे ही गोष्ट?))

रोमान्ससोबत तडजोडही महत्वाची

प्रेम हे एक पॅकेज आहे या पॅकेजसोबत तुम्हाला अनेक गोष्टी मिळतात. जसे की तडजोड, समंजसपणा, सहानुभूती यासारख्या अनेक गोष्टींनी रोमान्स भरलेला असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जाता तेव्हा तुम्ही जोडीदारासोबत 24*7 राहत असता. तेव्हा तुम्ही एकाच गोष्टीत अडकून न राहता पुढे जात राहणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही खऱ्या जीवनाला सामोरे जाता. तेव्हा तडजोडीचं महत्व पालकांनी मुलांना सांगितलं पाहिजे. तेव्हा ते रोमान्समध्येही तडजोड करतील.

हेही वाचा :  शोएब मलिकवर खरंच कारवाई झाली? मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर फ्रँचायझीने स्पष्टच सांगितलं, 'त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता...'

(वाचा – मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले… आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …