Valimai box office collection: बोनी कपूरचा ‘वालीमाई’ सिनेमा पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार?

Valimai box office collection : गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. 17 डिसेंबरला प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा आजही कोट्यवधींची कमाई करतो आहे. अशातच दाक्षिणात्य ‘वालीमाई’ सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने तीन दिवसांत जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘वालीमाई’ सिनेमा ‘पुष्पा’चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

‘वालीमाई’ सिनेमात अजित कुमार (Ajith Kumar) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. विकेण्डला या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. ‘वालीमाई’ सिनेमाने तीन दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. पण पुष्पा सिनेमाने 5 दिवसात 170 कोटींची कमाई केली होती.




‘वालीमाई’ सिनेमा आधी 13 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो आहे. 

संबंधित बातम्या

Bollywood Movies : सिनेसृष्टी पुन्हा बहरली, थिएटर्स स्क्रीन मिळवण्यासाठी रस्सीखेच

Movies releasing in March : अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’पासून प्रभासच्या ‘राधे श्याम’पर्यंत ‘हे’ सिनेमे मार्चमध्ये होणार प्रदर्शित

Sonu Sood : सोनू सूदने ‘रोडीज’च्या शूटिंगला केली सुरुवात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …