पोटाच्या या भागाला स्पर्श केल्यास समजतं लिव्हर झालं फेल, ही 9 लक्षणं दिसल्यास करा हे 5 उपाय

Liver Damage Treatment : जेव्हा Liver अर्थात यकृत खराब होते तेव्हा अन्न पचवण्याचे कार्य, आवश्यक प्रथिने, चांगले कोलेस्टेरॉल, एनर्जी साठवणे यांसारखी शरीराची महत्त्वाची कार्ये थांबतात. ही कार्ये इतकी महत्त्वाची आहेत की ती जर वेळोवेळी झाली नाहीत तर हळूहळू शारीरिक समस्या सुरू होतात आणि तरी त्याकडे लक्ष दिले नाही तर एकवेळ अशी येते की शरीर पूर्णपणे ठप्प होते. म्हणूनच लिव्हर वा यकृत हा अवयव निरोगी ठेवणे आणि रोगापासून त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

सहसा यकृताचा आजार हा कोणतीही लक्षणे लगेच दाखवत नाही. तो अत्यंत शांत पद्धतीने वाढत असतो आणि म्हणूनच यकृताचा आजार हा धोकादायक मानला जातो. पण जस जसा हा आजार वाढतो तस तशी काही लक्षणे दिसू लागतात आणि त्यावरून सावध होऊन तुम्ही वेळीच उपचाराला सुरुवात करू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

लिव्हर खराब झाल्यास दिसतात ही लक्षणे

लिव्हर खराब झाल्यास दिसतात ही लक्षणे

NIDDK नुसार, लिव्हरमध्ये समस्या सुरू झाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात –

  1. पोटाच्या वरील भागात स्पर्श केल्यावर वेदना होणे
  2. अस्वस्थता वाटणे
  3. पोटात पाणी भरणे
  4. भूक न लागणे
  5. थकवा जाणवणे
  6. शरीरावर अचानक निळे डाग पडणे
  7. खालच्या पायांना घोट्याला सूज येणे
  8. खाज सुटणे
  9. लघवीचा रंग बदलणे
  10. कावीळ होणे अन् डोळे आणि त्वचा पिवळसर होणे
हेही वाचा :  Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

ही अशी लक्षणे लिव्हरमध्ये बिघाड झाल्याचे संकेत देतात. अशावेळी त्वरित तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यायला हवेत.

(वाचा :- भारतावर H3N2 व COVID-19 चा डबल अटॅक, डॉक्टरांची चेतावणी – 5 पद्धतींनी लक्षणांतील फरक ओळखून लगेच करा हे 8 उपाय)​

सर्वात आधी हे काम करा

सर्वात आधी हे काम करा

जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे दिसली किंवा तुम्हाला शंका आली की तुमचे यकृत खराब झाले आहे तर सर्वप्रथम डॉक्टरकडे जा. त्यांना तुमच्या समस्या आणि शंका सांगा. शंका दूर करण्यासाठी तुम्ही यकृताच्या चाचण्या करून घेऊ शकता. याबाबत देखील तुम्हाला डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करू शकतात.
(वाचा :- डायबिटीजचे दुश्मन आहेत नैसर्गिक इन्सुलिन वाढवणारी ही 5 ड्रिंक्स, कितीही गोड खाल्लं तरी वाढतच नाही Blood Sugar)​

दारू पिणे बंद करा

दारू पिणे बंद करा

यकृत खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फॅटी लिव्हर आजार होय ज्याचा धोका दारू पिण्याने खूप वाढतो. त्यामुळे यकृत निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी दारूचे सेवन ताबडतोब बंद करावे.

(वाचा :- हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल व ट्राईग्लिसराईड एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर, खा हे बाराही महिने मिळणारं फळ)​

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

यकृताचा आजार झाल्यावर या गोष्टी खाऊ नका

यकृताचा आजार झाल्यावर या गोष्टी खाऊ नका

मायोक्लिनिकच्या मते, लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी काही खाद्यपदार्थ बंद केले पाहिजेत. तुम्हाला जर लिव्हरचा आजार झाला असेल वा त्यात समस्या जाणवत असेल तर तुम्ही लाल मांस, ट्रान्स फॅट, प्रक्रिया केलेले कार्ब आणि उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप या गोष्टींचे सेवन टाळले पाहिजे. या गोष्टींमुळे यकृताला मोठे नुकसान होते आणि त्यामुळे यकृत निकामी होऊ शकते.

(वाचा :- Honey Singh Mental Disease: हनी सिंगला झालेला हा आजार, उपचारासाठी लागले तब्बल 7 डॉक्टर्स, ही होती भयंकर लक्षणं)​

एवढा व्यायाम करा

एवढा व्यायाम करा

कोणताही अवयव निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. शरीराचे आजार टाळण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा 30 ते 60 मिनिटे व्यायाम करायलाच हवा.
(वाचा :- सावधान, XBB 1.16 च्या रूपात पुन्हा आला कोरोना,महाराष्ट्र-गुजरातमध्ये 754 लोक आजारी, 9 लक्षणांवर ठेवा बारीक नजर)​

कॅलरी कमी करा

कॅलरी कमी करा

जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुमचे पोट फुगलेले असेल तर तुम्हाला यकृताचे आरोग्य सुधारण्यसाठी आणि त्याची अधिक हानी होऊ न देण्यासाठी कॅलरीजवर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला दररोज 500 ते 1000 कॅलरीज कमी कराव्या लागतील जेणेकरून वजन नियंत्रित ठेवता येईल.
(वाचा :- 24 वर्षीय शिंवागी जोशीला Kidney Infection, दिसली ही 8 लक्षणं, अभिनेत्रीचा हा सल्ला खूप महत्त्वाचा आणि इशा-याचा)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  नुसरत भरूचाला ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांची बत्ती गुल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …