‘या’ कंपनीने शेकडो इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या; बॅटरीचा स्फोट होण्याची भीती

बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची भीती असल्याने ऑस्ट्रेलियात हजारो इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार परत मागवण्यात आल्या आहेत. कंपनीने 230 पेक्षा अधिक Porsche Taycan इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या आहेत. या गाड्याच्या मालकांना इशारा देण्यात आला आहे. सर्व व्हेरियंटमध्ये ही समस्या जाणवत आहे. 

ऑस्ट्रेलियात दोन गाड्यांमधील बॅटरींना आग लागल्यानंतर गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्फा रोमियो हायब्रीड एसयूव्हीसच्याही बॅटरी सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्यांनीही गाड्या परत मागवल्या आहेत. यानंतर पोर्शेने आपल्या गाड्याही परत मागवल्या आहेत. 

पोर्शेने 2022 ते 2023 मधील Porsche Taycan गाड्या परत मागवल्या आहेत. वाहतूक विभागाने या बॅटरीत बिघाड असून त्यात पाणी शिरत असल्याचं सांगितलं आहे. ‘उत्पादनाच्या समस्येमुळे, हाय-व्होल्टेज बॅटरी केसिंग आणि बॅटरी कव्हर दरम्यान अपुरी सीलिंग असण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती देण्यात आली आहे.

‘हाय व्होल्टेज बॅटरीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा आल्यास, आर्किंग होऊ शकते ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. यामुळे वाहनातील प्रवासी, रस्त्यावरुन प्रवास करणारे इतर किंवा जवळ उभे असणाऱ्यांना इजा किंवा मृत्यू होऊ शकतो,’ असं सांगण्यात आलं आहे. कार मालकांना गाड्यांची तपासणी तसंच रिपेअरिंग करण्यासाठी पोर्शेशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  थंडीत धुकं पडलेलं असताना कारमध्ये एसी लावावा की हीटर? 90 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पोर्श टायकनने निर्मिती केलेलं हे पहिलं इलेक्ट्रिक वाहन आहे. तसंच ऑस्ट्रेलियन बाजारपेठेतील सर्वात महागड्यांपैकी एक आहे, या मॉडेलची किंमत 132,550 डॉलर्सपासून ते 363,800 डॉलर्सपर्यंत आहे. 
सप्टेंबरमध्ये सिडनीमध्ये कारला लागलेल्या आगीनंतर ही बाब समोर आली होती. ज्यामध्ये इलेक्ट्रिक कारमधून काढलेल्या लिथियम-आयन बॅटरीला विमानतळ होल्डिंग यार्डमध्ये आग लागली आणि जवळपासची चार वाहनं या आगीत भस्मसात झाली. 

ट्रकमधून पडलेल्या ढिगाऱ्यामुळे टेस्ला मॉडेल 3 इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी खराब झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये NSW सदर्न हायलाइट्समध्ये आग विझवण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालं नव्हतं. 

आगीच्या घटनांनंतरही ऑस्ट्रेलियन रिसर्च ग्रुप EV FireSafe च्या डेटानुसार, वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जगभरातील 50 पेक्षा कमी व्हेरिफाइड इलेक्ट्रिक वाहनांना आग लागली. पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत या वाहनांना आग लागण्याची शक्यता खूपच कमी होती. बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना धडक किंवा मोडतोड झाल्यामुळे झाल्याचं त्यांना आढळलं आहे. याशिवाय बॅटरीमध्ये बिघाड आणि पाणी जाणं हीदेखील कारणं आहेत. 

ईव्ही फायरसेफच्या मुख्य कार्यकारी Emma Sutcliffe म्हणाल्या की, ई-बाईक किंवा ई-स्कूटरमध्ये लागणाऱ्या आगींच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारमध्ये आगीचा धोका कमी असतो

हेही वाचा :  Volvo ची नवीन Volvo Ex90 इलेक्ट्रीक SUV ची पहिली झलक, पाहा काय आहे यात खास?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …