Online Shopping : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, नाहीतर तुमची एक चूक अन् बँक खातं रिकामं!

Online Shopping: आजकाल स्मार्टफोनवर एका क्लिकवर सहज अनेक गोष्टी उपलब्ध होतात. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टी खरेदी करू शकता. त्यातच ई-कॉमर्स (e-commerce) कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक सेल आणि ऑफर्स आणत असतात. नियमित बाजाराच्या तुलनेत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आकर्षक डिस्काउंट मिळते. त्यामुळे नागरिकांची ऑनलाइनला जास्त पसंती असते. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर्स, बँक ऑफर्स, कूपन कोडचा फायदा मिळतो. मात्र ऑनलाइन खरेदी संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येते. त्यामुळे ऑनलाइन खरेदी (online shopping) करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमची एक चूक तुमचे बँकचे खाते रिकामी करू शकते.  

भारत Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी फसवणुकीला सामोरे जाण्यासाठी वन टाइम पासवर्ड (OTP) प्रणाली सुरू केली. यामध्ये जेव्हा डिलिव्हरी एजंट ग्राहकांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांना पार्सल मिळाल्यावर ओटीपी शेअर करावा लागतो. हे पार्सल संबंधित ग्राहकाला मिळाल्याची पुष्टी करते. मात्र हाच OTP आतासायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वापर आहेत. 

वाचा: 15 वर्षांनंतर भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामना होणार की नाही? बीसीसीआय काय घेणार निर्णय  

सायबर गुन्हेगार ग्राहकांची लूट करण्यासाठी डिलिव्हरी एजंट असल्याचे दाखवून फसवणूक करत आहेत. असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यात गुन्हेगार डिलिव्हरी एजंट म्हणून लोकांच्या घरी पोहोचत आहेत आणि डिलिव्हरीपूर्वी OTP शेअर करण्यास सांगत आहेत. मग लोकांकडून ओटीपी शेअर होताच ते फसवणुकीला बळी पडत आहेत.

हेही वाचा :  तुम्हाला Smartphone घ्यायचा आहे? 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 मोबाईल

काय आहे? फेक ओटीपी डिलिव्हरी स्कॅम

स्कॅमर्स ई-कॉमर्स (e-commerce) वेबसाइटवरून खरेदी करणाऱ्या अधिक लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच कोणते ग्राहक नियमितपणे पार्सल घेतात यावरही ठग लक्ष ठेवून असतात. यानंतर, डिलिव्हरी एजंट म्हणून ठग त्या ग्राहकांच्या घरी येतात आणि म्हणतात की अॅमेझॉन-फ्लिपकार्ट (Amazon-Flipkart) किंवा पोस्ट ऑफिसचे पार्सल हातात आहे. यानंतर, ठग लोकांकडे पैसे मागतात आणि त्यांच्याकडे डिलिव्हरीवर पैसे देण्याचा पर्याय असल्याचे सांगतात.

यावर, जर वापरकर्त्यांनी डिलिव्हरी घेण्यास नकार दिला तर ते पार्सल रद्द करा, असे सांगतात. यासाठी त्यांना एक ओटीपी मिळेल, जो त्यांना शेअर करावा लागेल. अशा परिस्थितीत अनेकजण या गुंडांच्या बोलण्याला बळी पडतात आणि ओटीपी देतात किंवा फोनवर मिळालेल्या लिंकवर क्लिक करून बसतात. मग ओटीपी स्कॅमरना मिळताच. ते फोन क्लोन किंवा हॅक करतात. त्यानंतर हॅकर्स फोनवरून बँकेचे तपशील चोरतात आणि लोकांचे पैसे लुटतात. अशा परिस्थितीत अशा गुंडांपासून सावध रहा. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे …