सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचं सात्विक घर, सोबर आणि मनमोहक मांडणी

सात्विक आणि पौष्टिक आहारच जीवनाचा मूलमंत्र आहे हे नेहमीच ऋजुता दिवेकरच्या टिप्सवरून दिसून येतं. घरचं जेवण आणि त्यातही प्रत्येक भाजीमधील सत्व, पोषण याबाबत ऋजुता आग्रही असते. करिना कपूर, करिश्मा कपूर अशा अनेक सेलिब्रिटींची आहारतज्ज्ञ असणारी ऋजुता सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे.

पोषक आणि सात्विक जेवणासह ऋजुताचे घर पाहिल्यानंतरही प्रसन्नच वाटते. अत्यंत सोबर, मनमोहक आणि तितकेच क्लासी एलिगंट असे हे घर सजवलेले आहे. ऋजुताच्या घराची सफर करताना तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. कशी केली आहे सुबक मांडणी जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – @rujuta.diwekar Instagram)

तुळशीवृंदावन

तुळशीवृंदावन

पूर्वपरंपरागत तुळशी वृंदावनाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ऋजुता खाण्यात ज्याप्रमाणे परंपरा पाळते आणि त्याचे महत्त्व पटवून देते तसंच घरातही तिने या गोष्टी फॉलो केल्या आहेत. आरोग्याला उपयुक्त ठरणारी अशी तुळशी घरात असून अगदी टिपिकल वृंदावन जपण्यात आले आहे. तुम्हीही घरात अशा पद्धतीने तुळशीचे वृंदावन सजवू शकता.

हेही वाचा :  ‘चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेच्या साध्या पण प्रेमाने भरलेल्या घराची झलक, मनात भरणारे इंटिरिअर

सुटसुटीत लाकडी फर्निचर

सुटसुटीत लाकडी फर्निचर

लाकडी फर्निचर आणि खुर्च्यांची गोष्टच वेगळी आहे. याचा लुकही अप्रतिम दिसतो. ऋजुताच्या एका रूममध्ये सुटसुटीत अशा या दोन खुर्च्या आणि टेबल ठेवण्यात आले आहे. तुम्हीही तुमच्या घरात अशा पद्धतीने कम्फर्टेबल खुर्च्यांची मांडणी करू शकता. यासह भिंतीवर एक मोठे पेंटिंग लाऊन या खोलीचा लुक पूर्ण करण्यात आला आहे.

(वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेच्या साध्या पण प्रेमाने भरलेल्या घराची झलक, मनात भरणारे इंटिरिअर )

पुस्तकांसाठी शेल्फ

पुस्तकांसाठी शेल्फ

भिंतीतच पुस्तकांसाठी शेल्फ तयार करण्याची आयडिया अधिक उत्तम आहे. तुम्हालाही वाचनाची आवड असेल आणि घरात पुस्तकं असतील तर ऋजुताने केलेल्या इंटिरिअरप्रमाणे तुम्हीही भिंतीत अशा पद्धतीने पुस्तकांसाठी शेल्फ तयार करून घेऊ शकता. तसंच या वाचनाच्या रूममध्ये तुम्ही योगाभ्यास करणेही सोयीस्कर ठरते.

(वाचा – समुद्रकिनाऱ्याची रोज अनुभूती, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या आलिशान घरातून दिसतो अथांग समुद्र)

लिव्हिंग रूममधील डायनिंग

लिव्हिंग रूममधील डायनिंग

लिव्हिंग रूममध्ये अशा पद्धतीचे डायनिंग तुम्हीही डिझाईन करू शकता. अत्यंत साधे आणि कम्फर्टेबल असे हे डायनिंग दिसून येत आहे. करीना आणि करिष्मासह जेवणाचा आनंद घेत असलेल्या ऋजुताने टेललमॅट्स, तसंच आरोग्याला पोषक असणाऱ्या भांड्यातील जेवण हेदेखील जपलेले दिसून येत आहे. आधुनिक भांड्यापेक्षा पितळेच्या भांड्यातील जेवण अधिक पौष्टिक ठरतं. त्याचाही तुम्ही वापर करून घेऊ शकता.

हेही वाचा :  इंटिरिअरच्या साम्राज्यात का ठरते गौरी खान ‘क्वीन’, होम डेकोरसाठी मिळेल रॉयल लुकची प्रेरणा

(वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद ओकचे घर आहे आशियाना, इंटिरिअरने डोळे दिपतील)

बैठकीची खोली

बैठकीची खोली

ही खोली पाहिल्यानंतर जुन्या काळातील बैठकीच्या खोलीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. अगदी साधे फर्निचर, खिडक्यांना असणारे पडदे आणि सुटसुटीत वस्तू. घरात अजून काय हवंय? गिरगाव, दादरच्या खोल्यांमधील तो आपलेपणा, ओलावा या इंटिरिअरमधून दिसून येतोय. नको तिथे स्टाईल करण्यापेक्षा अत्यंत सुटसुटीत इंटिरिअर हवं असेल तर तुम्ही यावरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

कोपऱ्यातील टेबल खुर्ची

कोपऱ्यातील टेबल खुर्ची

बसून अभ्यास करणे अथवा लॅपटॉप घेऊन काम करण्यासाठी रूमच्या कोपऱ्यात अशा पद्धतीची टेबल आणि खुर्ची फायदेशीर ठरते. काम झाल्यावर जागा हवी असेल तर फोल्डेड टेबल खुर्चीची आयडियादेखील तुम्ही करू शकता.

ऑफ-व्हाईट आणि टाईल्सचे स्वयंपाकघर

ऑफ-व्हाईट आणि टाईल्सचे स्वयंपाकघर

हल्ली आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटिरिअरचा वापर करून किचन अद्ययावत बनवले जाते. पण त्यातील आपलेपणा निघून जातो. ऋजुताचे हे स्वयंपाकघर पाहिल्यानंतर अगदी मराठमोळ्या घरातील किचनचा फील आल्यावाचून राहात नाही. किचनसाठी अजूनही तुम्ही टाईल्सची आयडिया कॅरी करू शकता.

बाल्कनीतील झोपाळा

बाल्कनीतील झोपाळा

अगदी मराठमोळ्या वातावरणात असल्याचा फील ऋजुताच्या बाल्कनीतील हा झोपाळा देत आहे. लाकडी झोपाळे आजकाल फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र बाल्कनीत बसून या झोपाळ्याचा आनंद घेण्याची मजाच वेगळी आहे.

हेही वाचा :  #राहाणारकीजाणार?: एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तर शिवसेना हातातून जाणार का?

ऋजुताचे घर पाहिल्यानंतरही नक्कीच एक सात्विक फील येतो आणि असेच घर हवे असेल तर तुम्ही या इंटिरिअरची आयडिया घेऊन त्यावर आपल्या आवडीप्रमाणे काम करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …