डीपनेक क्रॉप चोळी, पिंक 3D लेहंग्यात अनन्याने केला कलेजा खल्लास,नवरीऐवजी चर्चा या प्रिसेंसची

Ananya Pandey आजच्या घडीतील सर्वात जास्त चाहता वर्ग असणारी अभिनेत्री आहे यात काही शंकाच नाही. तिच्या सौंदर्याने घायाळ होणारा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर तिला फॉलो करतो आणि तिच्या स्टाईल व फॅशनचे कौतुक करतो. हेच कारण आहे की सध्या अनन्या पांडे दरोरोज ट्रेंडिंगमध्ये दिसते. अनन्या स्वत: सेलिब्रिटींच्या घरातून असल्याने स्टाईल आणि फॅशनचे बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळत आले आणि त्याचा अगदी योग्य वापर तिने आपल्या इमेज बिल्डींगसाठी केला.

तसा तर अनन्याचा प्रत्येक लूकच व्हायरल होत असतो. पण नुकताच समोर आलेला तिचा लुक अधिक जास्तच स्टनिंग दिसत आहे. आपली चुलत बहिण Alanna Pandey च्या लग्नसोहळ्या आधीचे सर्व कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे झाले आणि शुभ प्रसंगी अनन्या सुद्धा सहभागी झाली होती आणि आपल्या जबरदस्त लुकने तिने सर्व सोहळ्याची लाईमलाईटच हिरावून घेतली. अनन्याने यावेळी ग्रे शेडचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यावर थ्री डी फ्लोरल एम्ब्रॉयडरी कोरलेली दिसत होती. (फोटो सौजन्य :- tanghavri, starstylestory, ananyapanday, yogenshah_s इंस्टाग्राम)

हेही वाचा :  सुप्रियांवर कारवाई, शरद पवारांना सूट; अजित पवारांची नवी खेळी? राजकीय वर्तुळात चर्चा

परिधान केला होता डिजाईनर लेहंगा

परिधान केला होता डिजाईनर लेहंगा

अनन्या पांडेने तिची बहीण अलाना पांडे व नवरा आईव्हरच्या लग्न समारंभासाठी पेस्टल शेडचा सुंदरसा लेहेंगा निवडला होता, जो तिने फॅशन डिझायनर तरूण ताहिलियानीच्या कलेक्शनमधून पिक केला होता. ज्याची सर्वत्र खूपच वाह वाह झाली.
(वाचा :- टीना अंबानीच्या भाचीने रॅंपवॉकमध्ये केलं बेबी बंप फ्लॉंट,वहिनीपुढे पिवळ्याधम्मक साडीतील शनायाचा ब्लास्टही फेल)​

थ्री डी फ्लोरल एम्ब्रॉयडरी

थ्री डी फ्लोरल एम्ब्रॉयडरी

या लेहेंग्यावर रेखाटण्यात आलेली सुंदर थ्रीडी फ्लोरल एम्ब्रॉयडरी खूपच लक्षवेधी वाटत होती. तिने फ्लेर्ड स्कर्टसोबत क्रॉप चोळी परिधान केली होती ज्यामध्ये डीप स्वीटहार्ट नेकलाईन दिली होती. लखलखत्या लेहंग्यातील अनन्या जणू एखादी राजकुमारीच भासत होती.
(वाचा :- अब्जाधिश बिझनेसमॅनची पत्नी निघाली उर्फीहून वरचढ, मिनी ड्रेसवर लावली आईस्क्रीम कोनाची डिझाईन अन् तापवलं वातावरण)​

बॅक डिटेलिंगने वेधले लक्ष

बॅक डिटेलिंगने वेधले लक्ष

या चोळीच्या मागील बाजूस बीड्सनी सजवलेली एक लेस जोडण्यात आली होती, जी खूप सुंदर दिसत होती. अनन्याने फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला हलका दुपट्टा देखील कॅरी केला होता, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडली होती. या प्रसंगी नवरी अलानाला सोडून उपस्थित सर्वांची नजर अनन्यावरच खिळून राहिली.
(वाचा :- धर्माची भिंत तोडून ऑरेंज लेहंग्यात स्वरा भास्करने लावली फहादच्या नावाची हळद-मेहंदी,नवरीच्या गालावर लाजेची लाली)​

हेही वाचा :  ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा जलवा, चाहते म्हणतात अरे... कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू

हेअरस्टाईलने लावले चार चांद

हेअरस्टाईलने लावले चार चांद

अनन्याने आपला लूक पूर्ण करण्यासाठी लाईट फाउंडेशनसोबत डोळ्यांच्या मेकअपवर विशेष लक्ष दिले होते. केसांना कर्ल्समध्ये मोकळे सोडत तिने आपले केस हेअर एक्सेसरिजने सजवले होते. ज्यामध्ये ती एकदम प्रिंसेस दिसत होती. हेअरस्टाईल ही आपल्या लुकमधील सर्वात महत्त्वाची व आकर्षक गोष्ट असते म्हणून तर प्रत्येक मुलीची कार्यक्रम कोणताही असो हेअरस्टाईल काय करायची याची लगबग सुरू असते. तुम्हीही अनन्यासारखी साधी सिंपल 5 मिनिटांत होणारी पण तितकीच सुंदर दिसणारी हेअरस्टाईल साडी किंवा लेहंग्यावरच नाही तर हेवी ड्रेसवरही ट्राय करू शकता.
(वाचा :- अनन्या पांडेपेक्षाही अप्सरा आहे बहीण अलाना, बर्ड वर्क कोरलेल्या डीपनेक व बॅकलेस ब्लाऊजमध्ये लावली इंटरनेटवर आग)​

मेहंदी सेरेमनीमधील लुक

मेहंदी सेरेमनीमधील लुक

अनन्या ही बहीण अलाना पांडेच्या मेहंदी सेरेमनीमध्ये सुद्धा उपस्थित होती. यावेळी अनन्या पांडेने आई भावना पांडेसोबत मेहेंदी सेरेमनीमध्ये एन्ट्री घेतली आणि तिच्या पेस्टल शेडच्या आउटफिटमध्ये तिने सगळ्यांनाच घायाळ केले. तिने प्लीटेड स्कर्टसह एक छोटी चोळी परिधान केली होती, ज्याची डिजाईन झाडाच्या पानांसारखी होती. अनन्याने मिनिमल मेकअप करून आपले केस पोनीटेलमध्ये बांधले होते. भावना पांडेने पेस्टल ग्रीन कलर गोटा आणि जरी वर्क सूट परिधान केला होता, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती. तिने कानात मोठे झुमके घालून लुक राऊंड ऑफ केला होता.
(वाचा :- OYO चे मालक रितेश अग्रवालच्या बायकोला लाल साडीत बघून फिटेल डोळ्यांचं पारणं, अब्जाधिश असून जिंकले साधेपणाने मन)​

हेही वाचा :  यशवंत जाधवांनी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिलेल्या त्या ‘मातोश्री’ कोण? गुप्त डायरीतील माहिती..

झगा कसा वा-यावरती उडतो, बघा अनन्या पांडे परी लुक..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …