हिंदू-मुस्लीम विभिन्न धर्म पण खऱ्या अर्थाने जिंकलं प्रेम, मिनी माथुर – कबीर खानच्या लग्नाला झाली २५ वर्ष

निवेदक आणि अभिनेत्री मिनी माथुरने दिग्दर्शक कबीर खानसह २५ वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. हिंदू आणि मुस्लीम दोन वेगवेगळे धर्म. २५ वर्षांचा हा प्रवास मिनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्यक्त केला आहे. नवरीची वाजत गाजत एंट्री नाही, सब्यासाचीचा लेहंगा हवाच असा अट्टाहास नाही आणि Wedding Hashtags नाहीत अशा काळात झालेलं लग्न असं म्हणत मिनीने कबीरसह २५ वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास अत्यंत भावनिक शब्दात मांडला आहे.

मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाच्या सहवासात झालेलं हे लग्न म्हणजे कायम लक्षात राहणारं आणि आनंदी वातावरणात नाचत गाजत झालेलं असं हे लग्न कायम स्मरणात राहील असं म्हणत मिनीने संपूर्ण २५ वर्षाच्या काळाला उजाळा दिला आहे. (फोटो सौजन्य – @minimathur Instagram)

​पूर्ण प्लॅनिंगसह कबीरची घडवून दिली होती भेट​

​पूर्ण प्लॅनिंगसह कबीरची घडवून दिली होती भेट​

मिनी माथुरचे वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते आणि आपल्या मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलासह लग्न करावे हे त्यांना अजिबात मान्य नव्हते. मिनीने बँकर अथवा इंजिनिअर मुलाशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कबीरला डेट करताना मिनीने आपल्या वडिलांशी भेट घडवताना पूर्ण प्लॅनिंगसह घडवून आणली होती.

हेही वाचा :  डिजिटल इंडिया मोहीम: घरात किंवा गावात बसून पैसे कमवता येणार, फक्त घ्यावे लागेल 'हे' सरकारी ट्रेनिंग; पाहा डिटेल्स

​कबीरचे आडनाव सांगितलेच नाही​

​कबीरचे आडनाव सांगितलेच नाही​

कबीर मुस्लीम असून मिनीने वडिलांची भेट करून देताना त्याचे आडनावच सांगितले नाही. साधारण १ वर्ष घरी येणंजाणं राहिल्यानंतर दोघांनी घरी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. लग्नाबाबत सांगताना कबीरने त्याचे आडनाव मिनीच्या वडिलांना सांगितले होते. पण तोपर्यंत कबीरचा स्वभाव त्यांना माहीत झाला होता आणि कबीर त्यांना आवडू लागला होता. त्यामुळे दोघांना लग्नासाठी परवानगी मिळाली.

(वाचा – पहिल्याच भेटीत शाहीदला आवडली मीरा राजपूत, १३ वर्षांनी लहान असूनही केले अरेंज मॅरेज)

​कबीर आहे नास्तिक​

​कबीर आहे नास्तिक​

मिनी आणि कबीरने नेहमीच एकमेकांना साथ दिली. गेल्या २५ वर्षात कबीरने इंडस्ट्रीला अत्यंत हिट चित्रपट दिले. तर मिनीने आपले करिअर सोडून दोन मुलांना सांभाळले. मात्र कबीरच्या कामात तिने नेहमीच साथ दिली. अनेकदा मिनी कबीरचे आडनाव लावत नाही म्हणून सोशल मीडियावर तिला त्रास देण्यात आला होता. मात्र कबीर नास्तिक असून या गोष्टींचा फरक पडत नाही असे मिनीने सांगितले होते.

(वाचा – चेन्नई सुपर किंग्जच्या शिवम दुबेची फिल्मी लव्ह स्टोरी, समाजाची बंधने झुगारून केले होते अंजुम खानशी लग्न)

हेही वाचा :  ‘ब्रिक्स’ परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष! पण भारताचा समावेश असलेलं BRICS आहे तरी काय?

​धर्म कधीच आड आला नाही​

​धर्म कधीच आड आला नाही​

कबीर आणि मिनीच्या प्रेमाच्या बाबतीत कधीच धर्म आड आला नाही. मिनीने कायम लग्नानंतर हिंदू धर्माच्या परंपरा जपल्या. कबीर आणि मिनीच्या प्रेमात याचा कधीच व्यत्यय आला नाही. त्यामुळे २५ वर्ष पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रेम जिंकले असंच म्हणावं लागेल

(वाचा – पहिल्या भेटीत न आवडलेल्या राजकुमार रावबरोबरच केले पत्रलेखाने लग्न, अशी घडली लव्ह-स्टोरी)

​मिनी आणि कबीरचे कायमचे प्रेम​

​मिनी आणि कबीरचे कायमचे प्रेम​

मिनी आणि कबीरला एक मुलगा विवान आणि सैराह नावाची एक मुलगी आहे. चौकोनी असे हे कुटुंब नेहमीच वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. तर धर्माच्या पलीकडेही माणुसकी, प्रेम या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत हाच आदर्श या कुटुंबाने घालून दिला आहे.

​माणुसकी हाच धर्म​

​माणुसकी हाच धर्म​

मिनीने नेहमीच आपल्या घरात माणुसकी हाच धर्म असल्याचे केवळ सांगितले नाही तर गेले २५ वर्ष हेच जपत असल्याचे दाखवून दिले आहे. तर अजूनही मिनी आणि कबीरने आपले प्रेम आणि नातं जपत पुढच्या वाटचालीला सुरूवात केल्याचेच या पोस्टवरून दिसून येत आहे.

मिनी आणि कबीरच्या नात्यावरून हेच सिद्ध होते की, खरे प्रेम, आपुलकी, काळजी आणि एकमेकांबद्दल आदर असेल तर कोणताच धर्म आणि जात त्यात आडवे येऊ शकत नाहीत.

हेही वाचा :  एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …