फरहान अख्तरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

Farhan Akhtar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा जगभरातील विविध शहरांमध्ये आपल्या बँडसोबत परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी ‘फरहान लाईव्ह’ या फरहानच्या बँडच्या लाईव्ह प्रोग्रॅमचे आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे करण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियामधील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. फरहानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली. 

फरहानचा ‘फरहान लाईव्ह’ हा बँड प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कॉलेज फेस्टिव्हलमध्ये तसेच म्युझिक इव्हेंटमध्ये ‘फरहान लाईव्ह’ बँड परफॉर्म करतात. काही दिवसांपूर्वी फरहानच्या ‘फरहान लाईव्ह’ या बँडने पुण्यामध्ये परफॉर्म केलं. ‘फरहान लाईव्ह’ या बँडच्या लाइव्ह परफॉर्मन्सचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं. पण हा लाईव्ह प्रोग्रॅम रद्द करण्यात आला. फरहानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली. 

फरहानची पोस्ट

फरहानने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “अनपेक्षित परिस्थितीमुळे आमच्या ‘फरहान लाईव्ह’ बँडला ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागला. आम्ही या वीकेण्डला सिडनी आणि मेलबर्नमध्ये येऊन परफॉर्म करु शकत नाही. यामुळे आम्ही निराश झालो आहोत. पण या सुंदर देशाला आम्ही नंतर भेट देऊ आणि तिथे परफॉर्म देखील करु.”


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

फरहानची ही पोस्ट पाहून काही नेटकरी भडकले आहे. त्याच्या या पोस्टला काही युझर्सनं कमेंट केली. एका नेटकऱ्यानं फरहानच्या पोस्टला कमेंट केली, ‘आमचे पैसे परत दे.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘आम्हाला रिफंड कुठे मिळेल?’ 

हेही वाचा :  राखीच्या पैशांनी आदिलने दुबईत घर घेतलंय : राकेश सावंत

फरहानचे चित्रपट

‘रॉक ऑन’, ‘रॉक ऑन 2’ या चित्रपटामध्ये फरहानने रॉक स्टारची भूमिका साकारली. या चित्रपटातील गाणी देखील त्याने गायली आहेत. वजीर चित्रपटातील अतरंगी यारी हे गाणं देखील फरहानने गायलं आहे. फरहान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. दिल धडकने दो, जिंदगी मिलेगी ना दोबारा यांसारख्या चित्रपटांमधील फरहानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कटरीना कैफ यांच्या ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन फरहान करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Netflix March Release 2023: नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा धमाका; मार्च महिन्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …