अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Aditi Rao Hydari- Siddharth Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी  (Aditi Rao Hydari) ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या  वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मुंबईतील एका कॅफेमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ (Siddharth) हे दोघे काही दिवसांपूर्वी डेटला गेले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. नुकताच अदिती आणि सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमधील दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  

अदितीनं शेअर केला व्हिडीओ

अदितीनं शेअर केलेल्या सिद्धार्थसोबतच्या डान्स व्हिडीओमध्ये ते दोघे खास लूकमध्ये दिसत आहेत. अदिती प्रिंटेड ब्लॅक शरारा आणि सिद्धार्थ हा ब्लॅक टी-शर्ट अशा सिंपल अँड कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमधील अदिती आणि सिद्धार्थच्या डान्स स्टेपनं अनेकांचे लक्ष वेधले. या व्हिडीओला अदितीनं ‘डान्स मंकीज…. द रील डील’ असं कॅप्शन दिलं आहे. 

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

अदिती आणि सिद्धार्थ यांच्या डान्सच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं या दोघांच्या व्हिडीओला कमेंट केली, ‘दोघांचे अभिनंदन, तुमच्या लग्नाचे फोटो कधी शेअर करत आहात? ते पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत’, ‘हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का?’, असा प्रश्न एका नेटकऱ्यानं अदितीनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन विचारला. अदितीनं शेअर केलेला हा व्हिडीओ जवळपास तीन मिलियनपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. 

हेही वाचा :  रिक्षा चालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; जाणून घ्या अक्षय केळकरचा प्रवास

पाहा व्हिडीओ:


अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या डेटिंगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पण अजूनही दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण दोघांच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अदिती आणि सिद्धार्थ हे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता अदितीनं सिद्धार्थसोबत एका दाक्षिणात्य गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

अदिती आणि सिद्धार्थचे चित्रपट

अदितीचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला दिल्ली 6 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तर सिद्धार्थच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. रंगदेबसंती, बॉस यांसारख्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ प्रमुख भूमिका साकारली. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Aditi Rao Hydari And Siddharth: अदिती राव हैदरी करतेय सिद्धार्थला डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …