धडधाकट पुरूष असून बायकोला आवरू शकत नाही याची लाज वाटतीये, पुरूषाचा जन्म घेतला हे चुकलं का?

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे. मी माझ्या पत्नीसोबत अजिबात खुश नाही. कारण तिला असे वाटते की तिला सगळ्यातलं सगळं कळतं. त्यामुळे ती कोणाचेच काही ऐकत नाही. तिच्या या वृत्तीमुळे ती माझ्या बहिणी आणि आई-वडिलांसोबतचे आमचे नाते दिवसेंदिवस बिघडवत चालली आहे. ती त्यांना सतत सांगत राहते की त्यांना ज्या गोष्टी माहित आहे त्या कशा चुकीच्या आहेत आणि तिला जे माहित आहे तेच कसे बरोबर आहे. जेव्हा जेव्हा यावरून वाद होतात तेव्हा तेव्हा मी मध्ये पडून गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येकवेळी असे करणे मला शक्य नाही आणि माझी बायको सुद्धा समजून घेत नाही.

तिला इथेही तिच बरोबर वाटते. जेव्हा कुटुंबात आपण असतो तेव्हा सर्वांच्या मानाचा विचार करावा लागतो. पण हीच गोष्ट माझ्या पत्नीला कळत नसल्याने आमचे इतरांसोबतचे नाते बिघडत आहे. मला काय करावे काहीच कळत नाहीये. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)

जाणकारांचे उत्तर

जाणकारांचे उत्तर

अनादर लाइट काउंसेलिंगच्या संस्थापिका आणि रिलेशनशिप एक्सपर्ट आंचल नारंग, म्हणतात की मी समजू शकते की ही परिस्थिती तुमच्यासाठी खूप निराशाजनक आणि त्रासदायक आहे. परंतु मला विश्वास आहे की जर तुम्ही प्रत्येक नात्याची एक मर्यादा ठेवली वा सीमा आखली तर या गोष्टी सहज ठीक होऊ शकतात. तुमचे अन्य नाते संबंध सुद्धा ठीक राहतील. सर्वप्रथम तर तुम्हाला तुमच्या पत्नीशी बोलावे लागेल.

हेही वाचा :  मी एक चांगली आई तर झाली, पण मुलाला आयुष्यात कधीच वडिलांचं सुख देऊ शकणार नाही

(वाचा :- काय आहे रिलेशनशिपचा 3 Month Rule? ब्रेकअपनंतर फॉलो केल्यास नवीन पार्टनर मिळाल्यावर सोन्याहून पिवळं होईल नातं.!)​

पत्नीला या गोष्टी सांगा

पत्नीला या गोष्टी सांगा

पत्नीला स्पष्ट सांगा की तिच्या वागण्यामुळे तुमची बहीण आणि पालकांसोबतचे तुमचे नाते बिघडत चालले आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कदापि मान्य नाही. शिवाय तुम्ही त्यांना हे सुद्धा सांगा की प्रत्येक वेळीत्या बरोबरच असतील असे नाही. तसेच कोणाशी बोलताना समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी घेऊनही बोलावे. या काही गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगणे सर्वात आधी गरजेचे आहे.
(वाचा :- पुरूषहो, हे 6 गुण ज्या मुलांमध्ये असतात त्यांना मुली समजतात Husband Material, कधीच सिंगल राहत नाहीत असे पुरूष)​

संसारात वितुष्ट येऊ शकते

संसारात वितुष्ट येऊ शकते

तुम्ही सांगितले की तुम्ही तुमच्या पत्नीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे पण ती तुमचे काहीच ऐकत नाही, अशा परिस्थितीत मी म्हणेन की तिच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांना सांगा की कुटुंबात राहताना प्रत्येकाला सोबत घ्यावे लागते. तुमचे बोलणे ऐकून त्यांचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. मात्र अशावेळी सुद्धा तुम्हाला शांतपणे आणि संयमाने काम करावे लागेल. कारण हे एक कारण तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करू शकते.

हेही वाचा :  लग्नानंतर पुरूष का होतात इतर महिलांकडे आकर्षित? समोर आलं धक्कादायक कारण, पायाखालची जमीन सरकेल

(वाचा :- लग्नानंतर काही महिन्यांतच मी नव-याला नको त्या स्थितीत रंगेहात पकडलं, नंतर नव-याने जे केलं ते ऐकून हादरूनच जाल)​

पत्नी ऐकतच नसेल तर

पत्नी ऐकतच नसेल तर

जर तुमही खूप प्रयत्न करून सुद्धा तुमची पत्नी तुमचे ऐकायला तयार नसेल तर तुम्ही तिच्या बचावासाठी वा तिची इमेज राखण्यासाठी वा इतरांचा राग शांत करण्यासाठी धावत जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा की ती तशीच आहे आणि तुम्ही तुमचे त्याच्या सोबत असणारे नाते नीट ठेवा. कारण यीच्या चुकीमुळे तुम्ही इतरांपासून दुरावू नका. उलट तुमचे नाते आहे तसेच ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
(वाचा :- लग्नानंतरची पहिली होळी होईल सोन्यासारखी लख्ख अन् इंद्रधनुसवे रंगीबेरंगी, नात्याला असा द्या प्रेमाचा झगमगता रंग)​

कुटुंबियांशी बोला

कुटुंबियांशी बोला

तुम्ही या संदर्भात ज्या ज्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या पत्नीच्या वागण्याचा त्रास होतो आहेत्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावे. तुम्ही तुमच्या पत्नीचे समर्थन करत नाही हे देखील स्पष्ट करा आणि त्यांना देखील समजावण्याचा प्रयत्न करा. मला एवढेच वाटते की तुम्ही स्व:चे नाते जरी नीट ठेवले तरी तुमचे नातेवाईक नेहमी जवळ राहतील. पण जर तुम्ही पत्नीची बाजू घेऊन बोलत राहिलात तर तुमची इमेज देखील खराब होऊ शकते.
(वाचा :- लग्नानंतर 6 महिने या 5 गोष्टींसाठी सर्वच लोक कुत्रा-मांजरासारखे भांडतात, जर पार्टनरला वाईट समजत असाल तर सावधान)​

हेही वाचा :  काळा कुर्ता गळ्यात चेन असलेला संजू बाबाचा रावडी लुक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …