राणी मुखर्जीच्या जॉकेटवरील ‘ओम’ ने वेधले सर्वांचे लक्ष, करण जोहरच्या मुलांच्या बर्थडे पार्टीमध्ये स्टार किड्सचा धमाका

काल मुंबईत दिग्दर्शक करण जोहर यांच्या जुळ्या मुलांचा म्हणजेच यश आणि रुहीचा यांच्या ६ वा वाढदिवस खूप उत्साहात साजरा केला गेला. यावेळी राणी मुखर्जी, नेहा धुपिया, सोहा अली खान, शिल्पा शेट्टी, शाहिद कपूर, करिना कपूर यांनी हजेरी दाखवली. यावेळी या कलाकरांचा ग्लॅमरस लुक पाहून तुम्ही देखील हैराण होऊन जाल. यावेळी राणी मुखर्जीच्या जॅकेटवरील ओमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे कलाकारांचे लुक सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

रितेश जेनिलियाच्या मुलांचे संस्कार

रितेश जेनिलियाच्या मुलांचे संस्कार

रितेश आणि जेनिलियाच्या मुलांचे संस्कार जग जाहीर आहेत. रितेश आणि जेनिलिया त्याच्या मुलांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेताना दिसतात. या गोष्टीची प्रचिती यश आणि रुहीच्या बर्थडेच्या दिवशी देखील पाहायला मिळाली. या संध्याकाळी दोघांनी सर्वांना नमस्कार करुन आदर व्यक्त केला. यावेळी या दोघांनी लाल आणि पिवळ्या रंगाची हुडी परिधान केली होती.

हेही वाचा :  कंगना रणौतला करायचंय करण जोहरला 'लॉकअप'मध्ये बंद , 'या' स्टार्सचीही सांगितली नावं

(वाचा :- जाळीदार ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा ग्लॅमरस अंदाज, प्रियांका चोप्राचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल)

शिल्पा शेट्टीचा लुक

शिल्पा शेट्टीचा लुक

या सुंदर संध्याकाळी शिल्पा शेट्टीने अ‍ॅनिमल प्रिंट पँट परिधान केली होती. या लुकला साजेसा असा टॉप देखील तिने यावेळी केला होता. या लुकला परफेक्ट करण्यासाठी शिल्पाने ब्लॅक रंगाची बॅग देखील घेतली होती. बर्थडे पार्टीसाठी हा खूपच सुंदर लुक होता. तु्म्ही देखील एखादया पार्टीला असा लुक कॅरी करु शकता.

(वाचा :- या खास व्यक्तीने केली होती श्लोका आकाशच्या लग्नाची सर्व तयार, लेहेंग्यावर साकारण्यात आली होती Lovestory) ​

राणीच्या जॉकेटने वेधले लक्ष

राणीच्या जॉकेटने वेधले लक्ष

यावेळी अभिनेत्री Rani Mukherjee च्या भन्नाट लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासंध्याकाळी राणीने ब्राऊन रंगाची पँट परिधान केली होती. या पँटच्या अर्धा भागावर कॉफी शेड देखील देण्यात आला होता. तर यावेळी राणीने परिधान केलेल्या ओम जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(वाचा :- सबसे कातिल गौतमी पाटील, लवकरच Web series मध्ये झळकणाऱ्या गौतमीच्या ग्लॅमरस अंदाजावर नजर टाकाच) ​

अंबानींच्या सूनेचा ग्लॅमरस लुक

हेही वाचा :  डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं... हाच प्रश्न

सोहा अली खान तिच्या परीसोबत पोहचली पार्टीला

सोहा अली खान तिच्या परीसोबत पोहचली पार्टीला

या संध्याकाळी सोहा अली खान तिच्या मुलीसोबत या पार्टीमध्ये पोहचली होती. यावेळी तिच्या मुलीने रेड रंगाचा क्युट ड्रेस परिधान केली होता. यामध्ये ती अगदी बाहुलीप्रमाणे दिसत आहे. तर सोहाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यासर्वांना पाहून पालक म्हणून सर्वांनी आरामदायी कपड्यांना प्राधान्य दिले.

तैमुरचा नवाबी लुक

तैमुरचा नवाबी लुक

बर्थडे बॉय यश आणि रुहीचा बेस्टफ्रेंड तैमुर यावेळी ब्लु रंगाच्या टि- शर्टमध्ये पाहायला मिळाला. तर त्याच्या आईने करिना कपूर डेनिमच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळाली. यावेळी लुक पूर्ण करण्यासाठी करीनाने व्हाईट रंगाचे शूज परिधान केले होतो.

(वाचा :- अर्थमंत्र्यांच्या पेहरावातून दिसून येते भारताच्या संस्कृतीची झलक,Union budget 2023 सादर करताना नेसली ही साडी)

करिना आणि शाहिद कपूर आमनेसामने

करिना आणि शाहिद कपूर आमनेसामने

या बर्थडे पार्टीला करिना आणि शाहिद कपूर एकमेकांच्या आमने सामने आलेले पाहायला मिळाले. यावेळी शाहिदने व्हाईट रंगाचा टीशर्ट परिधान केला होता तर मीर राजपूतने ब्राऊन रंगाचा सुट परिधान केला होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …