Gautam Adani: 20 हजार कोटींचा FPO रद्द का केला? गौतम अदानी अखेर आले समोर, Video केला प्रसिद्ध

Gautam Adani on Enterprises FPO: अदानी समूहाने (Adani Group) आपली फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेची (Adani Enterprises) 20 हजार कोटींच्या ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ (Follow On Public Offer) अर्थात ‘एफपीओ’ (FPO) प्रक्रिया रद्द केली आहे. अदानी समूहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. यादरम्यान आता अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वत: पुढे येऊन या गुंतवणूकदारांशी संवाद साधला असून ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्यामागील कारण सांगितलं आहे.

FPO प्रक्रिया रद्द का केली?

गौतम अदानी यांनी पूर्पणणे सबस्क्राइब्ड FPO नंतर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण बाजारात होणारे चढ-उतार पाहता या विलक्षण परिस्थितीत FPO च्या प्रक्रियेत पुढे जाणे नैतिकदृष्टय़ा योग्य होणार नाही असं मत संचालक मंडळाने मांडलं.

गौतम अदानी यांनी सांगितलं आहे की, शेअर बाजारात होणारी हालचाल आणि चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं कंपनीचा हेतू आहे. यामुळे आम्ही FPO मधून मिळालेले पैसे परत करत अशून यासंबंधीचा व्यवहार बंद करत आहोत. 

हेही वाचा :  750000000000 इतक्या कोटीचा झाला अदाणी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं

पुढे ते म्हणाले की, माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित प्राथमिकता आहे. यासाठी गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO प्रक्रिया मागे घेतली आहे. या निर्णयाचा आमचा सध्याचा कारभार आणि भविष्यातील योजनांवर काही फरक पडणार नाही. 

“गुंतवणूकदारांना मला सोबत दिली”

“एक उद्योजक म्हणून गेल्या चार दशकांच्या माझ्या प्रवासात माझे हितचिंतक आणि गुंतवणूकदारांच्या समूहाने मोठं समर्थन दिलं. मी आयुष्यात जे काही थोडं, जास्त मिळवलं आहे ते त्यांच्या विश्वासाच्या आधारेच आहे. मी माझ्या यशाचं सर्व श्रेय त्यांना देतो”.

FPO म्हणजे काय?

फॉलो-ऑन समभाग विक्रीला सेकंडरी ऑफरिंग म्हणूनही ओळखलं जातं. ही एक प्रक्रिया आहे ज्याअंतर्गत स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केलेली कंपनी विद्यमान भागधारकांना तसेच नवीन गुंतवणूकदारांना नवीन समभाग जारी करते.  

शेअर्स कोसळले

अदानी एंटरप्रायझेसचा शेअर बुधवारी 28.50 टक्क्यांनी कोसळून 2128.70 रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसने 3112 ते 3276 रुपये किंमतीत शेअर्स विकले होते. 

हेही वाचा :  'शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,' राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले 'उद्या जर त्यांनी गौतम अदानींना...'

अदानी समूहाकडून निवेदन प्रसिद्ध

एफपीओ प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयानंतर अदानी समूहाने निवेदन प्रसिद्ध केलं होतं. यात सांगण्यात आलं होतं की, अभूतपूर्व परिस्थिती आणि सध्याची बाजारातील अस्थिरता लक्षात घेता एफपीओच्या माध्यमातून मिळवलेला निधी परत करत आहोत. तसंच पूर्ण झालेला व्यवहार मागे घेत आहोत. गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाचे उद्दिष्टाने हा निर्णय घेत आहोत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …