पोलीस उपायुक्तांनी ९ महिन्यात तब्बल ​४५ वजन केलं कमी, प्रेरणादायी प्रवास

मेट्रोचे पोलिस उपायुक्त जितेंद्र मणी त्रिपाठी यांचा वजन कमी करण्याचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. देशसेवा करत असताना त्यांनी आपली प्रकृती सांभाळत अनेकांना प्रेरणा दिली आहे. जितेंद्र त्रिपाठी यांनी केवळ 9 महिन्यांत 45 किलो वजन कमी केले आहे. त्यांचा हा प्रवास कुटुंबियांसोबतच सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य- टाईम्स ऑफ इंडिया)

पत्नीचे 2018 मध्ये निधन झाले

-2018-

माझ्या तब्बेतीला माझा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. माझ्या पत्नीचे कर्करोगामुळे 2018 मध्ये निधन झाले. ज्यामुळे मला अवेळी खाण्याची सवय लागली. या सगळ्यामुळे माझे वजन वाढले,” इंडियन एक्स्प्रेसने 49 वर्षांच्या जितेंद्र त्रिपाठी यांना काय वाटले ते सांगले.

​जितेंद्र यांच कौतुक

जितेंद्र यांचा नुकताच पोलिस आयुक्त संजय अरोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 90,000 हून अधिक कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा प्रमाणपत्रासह करण्यात आली.

जितेंद्रने प्रसारमाध्यमांना सांगितले की, “हे खूप खास वाटत आहे आणि वजन कमी करण्याची प्रेरणा आता आणखीनच वाढली आहे.

हेही वाचा :  अलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे

​जितेंद्र यांचा डाएट

जितेंद्र यांनी नो-कार्बोहायड्रेट्स, नो शुगर डाएट सुरू केला. महत्वाचं म्हणजे जितेंद्र यांनी आहारातून पॅकेज केलेले अन्नही कमी केले. फळे हा त्यांचा स्नॅक्स आहे आणि कॉफी आणि चहाऐवजी ते नारळपाणी पिणे पसंत करतात.

“मी फक्त डाळ, सब्जी, दही खातो.भात आणि चपाती जेवणात घेत नाही. जेव्हा जेव्हा मला भूक लागते तेव्हा माझ्याकडे ताक आणि सफरचंद सारखी फळे असतात. माझ्या दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात सॅलडचा मोठा भाग आणि अशक्तपणा टाळण्यासाठी प्रोटीन पावडरचा एक स्कूप असतो,” ही माहिती स्वतः जितेंद्र यांनी दिली आहे. त्याच्या आहाराबद्दल खुलासा केला.

रिकामी पोटी घेतला हा ज्यूस

रिकाम्या पोटी दुधीचा ज्यूसही ते घेतात. फायबरयुक्त अन्न असलेल्या दुधीच्या महत्त्वाबद्दल जितेंद्र म्हणतात, “लौकीचा रस फायबरशी संबंधित सर्व बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यास मदत करतो. माझ्यासाठी हे सर्वोत्तम, आरोग्यदायी पेय आहे.

​जेवणामुळे हा झाला बदल

जितेंद्र आपल्या आहाराला 12 इंच कंबर कमी करण्याचे श्रेय देतात. त्यामुळे त्यांचा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत झाली.

​दररोज एवढे पावल चालतात

आहाराव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी 15,000 पावले चालणे महत्वाचे होते. जितेंद्र त्रिपाठी नवी दिल्लीतील सिरी फोर्ट स्पोर्ट्स ग्राउंड वॉक ट्रेलवर सकाळी 6.45 ते सकाळी 9 दरम्यान चालत असतात. ते कधी कधी 20,000 पायऱ्या पार करतात.

हेही वाचा :  ऑर्कुटवर ओळख झाली, आकंठ प्रेम झालं, सारं जग सोडण्यासाठी मी तयार होती, पण..

(इंग्रजीत आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …