ऑर्कुटवर ओळख झाली, आकंठ प्रेम झालं, सारं जग सोडण्यासाठी मी तयार होती, पण..

म्हणतात ना अजाणतेपणी आपण अशा अनेक गोष्टी अनेकदा करून बसतो ज्या तेव्हा आपल्याला समजत नाहीत पण एक काळ लोटून गेला आणि त्या गोष्टी आठवल्या की मात्र हसू फुटल्याशिवाय राहत नाही. मी सुद्धा असंच काहीसं केलं. मी माझं प्रेम मिळवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी इतकी पछाडली होती की कोणी विचारही करणार नाही अशा गोष्टी मी करून बसली. कारण मी एक प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. लहानपणापासूनच प्रेम या गोष्टीचे मला आकर्षण निर्माण झाले. मी कधीच त्याच्याशिवाय राहू शकेन याची कल्पना करणंही माझ्यासाठी भयानक होतं.

त्यावळी मी फक्त 20 वर्षांची होती. प्रेम ही सगळ्यात मोठी शक्ती आहे वगैरे हे सर्व मानणारी मी मुलगी होती. तर त्याच धुंदीत माझ्याकडून अशा काही गोष्टी झाल्या ज्या मला आजही आठवतात. मी ज्याच्यावर प्रेम करायची त्याला सोडण्याची कल्पना सुद्धा मला सहन होत नव्हती. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

मी एक हुशार मुलगी होते

तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 20 वर्षांची होते. मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्यूएशन करण्यासाठी एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी अभ्यासात खूप जास्त हुशार होती. मी माझ्या जुन्या कॉलेजमधून ग्रॅज्यूएशनमध्ये पहिली आली होती. शिवाय नव्या कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत सुद्धा सर्वाधिक गुण मलाच मिळाले होते. तब्बल 500 मुलांमध्ये मी पहिली आणि तेव्हाच मी कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली. सगळे जण माझ्याशी मैत्री करण्यास उत्सुक होते.

हेही वाचा :  जिमला न जाता अगदी घरबसल्या खा हे ५ पदार्थ, वजनात आपोआप दिसेल फरक

(वाचा :- रोज या 5 चूका करणारे लोक आयुष्यात कधीच होत नाहीत श्रीमंत व यशस्वी, कायम सोसावी लागते पैशांची चणचण व गरीबीची झळ)

मी प्रेमात पडली

कॉलेजला आल्यावर साहजिक अभ्यासासोबत इतर गोष्टी कळू लागल्या. मला तेव्हा सोशल मीडियाचा मोठा नाद होते. सोशल मीडिया शिवाय तेव्हा मी अगदीच बोअर व्हायचे. तेव्हा ऑर्कुटचा जमाना होता. मी सुद्धा एक मस्त आयडी बनवली आणि माझी प्रोफाईल अशी ठेवली की कोणालाही वाचून माझ्याशी बोलावे वाटेल. तिकडे एन्ट्री करताच मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. सगळे जण माझ्या ऑनलाईन फ्रेंड्स होते. त्यातच काळात माझी त्याच्याशी ओळख झाली आणि मी त्याच्या प्रेमात पडली.

(वाचा :- Virat Kohli ने करोडो मुलींमधून बायको म्हणून का केली अनुष्का शर्माचीच निवड? यामागील कारण अनेकांना आजही माहित नाही)

त्याला शारीरिक जवळीक हवी होती

सुरूवातीला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तो मला खूप जास्त आवडला. पण हळूहळू गोष्टी बदलू लागल्या आणि 3 महिन्यांत त्याची न पाहिलेली बाजू मला दिसली. तो अनेक गोष्टी माझ्यावर थोपवू लागल्या. त्याच्या म्हणण्याप्रमाणेच मी वागावे अशी त्याची अपेक्षा होती. कधीकधी तो जबरदस्ती देखील करायचा. मुळात त्याला माझ्या शरीराचा उपभोग हवा होता. त्यासाठी तो अनेकदा मला विचारणा करत असे. अनेकदा त्याने जास्त जवळीक करण्याचा प्रयत्न केला. पण मी मानसिकदृष्ट्या या सर्व गोष्टींसाठी अजिबातच तयार नव्हती.

हेही वाचा :  9 महिने आधी घडलेल्या भयंकर घटनेने आयुष्य उद्धवस्त झालं, ते 6 तास कठोर परीक्षा देऊनही शेवटी..!

(वाचा :- माझी कहाणी : वाटलं नव्हतं माझी मैत्रीण धोकेबाज असेल, नव-याचं आयुष्य पार उद्धवस्त करायला निघाली आहे, मी काय करू?)

आणि ती गोष्ट घडली

मला शारीरिक संबंधांशी प्रॉब्लेम होता. किस करण्याशी नाही. हे मी त्याला समजावून सांगितले. लग्नाआधी या सगळ्या गोष्टी करण्याची माझी देखील इच्छा नव्हती. तो मला वैतागला आहे हे त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसायचं. एकदा माझा वाढदिवस आला. आणि मी खूप खुश होती कारण तो काहीतरी खास सरप्राईज देखील असे वाटले. पण उलटेच घडले. त्याने मला 3 तास त्या जागी थांबवून ठेवले ज्याजागी एकही माणूस फिरकत नव्हते, ती जागा सुमशान होती आणि स्वत: मात्र शेवटपर्यंत आलाच नाही.

(वाचा :- माझी कहाणी : सर्व छान असतानाही मला लग्नाची प्रचंड भीती वाटतीये, यासाठी माझेच आई वडिलच आहेत जबाबदार, मी काय करू?)

त्याने मला फसवले

मी त्याच्यावर खूप जास्त चिडली कारण त्याने माझा अत्यंत खास दिवस वाया घालवला होता. मी हळूहळू त्याच्याशी बोलणे सोडले आणि आमचे नाते संपले. पुढे 2 वर्षे आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. मात्र अचानक त्याचा एकदा कॉल आला आणि तो म्हणाला त्याची मावशी आजारी आहे आणि त्यासाठी त्याला पैश्यांची मदत हवी आहे. मी त्याला माणुसकी म्हणून 25,000 ट्रान्स्फर केले. परत दुसऱ्या आठवड्यात त्याचा कॉल आला आणि त्याने 15,000 रुपये मागितले.मी परत दिले. काही महिन्यांनी मी माझे पैसे परत मागण्यासाठी त्याला कॉल करू लागली. पण तो कॉल उचलेनाच. तेव्हा कळले की मला फसवले गेले आहे.

हेही वाचा :  कलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल... रघुवीर खेडकर यांचा टीका

(वाचा :- लग्नाआधी पतीविषयी काहीच माहित नव्हतं, त्याची एक घाण सवय जीवघेणी ठरतीये, जवळ जाण्याची इच्छा होत नाही, मी काय करू?)

मला आता फक्त हसू येतं

माझी ही स्टोरी फार कमी लोकांना माहित आहे. आज, मी माझ्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे, मला वाटते की फसवणूक होणे ही खरोखरच एक अत्यंत वाईट गोष्ट आहे. मात्र, हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. माझ्या नातवंडांना सांगण्यासाठी माझ्याकडे एक छान कहाणी आहे. मात्र, या घटनेनंतरही मी लोकांना मदत करणे थांबवले नाही. आजही मी माझ्या पगाराचा काही भाग हा NGO ला देते. पण मला या गोष्टीचा पश्चाताप आता वाटत नाही उलट हसू येते की मी किती वेडेपणाने वागले. पण त्या अनुभवाने मला खुश हुशार देखील बनवले याचे समाधान आहे.

(वाचा :- काश…! सासू व सास-यांसमोर ‘ही’ एक गोष्ट करण्याआधी मी काळजी घेतली असती, तर माझ्यासोबत इतकी वाईट घटना घडली नसती..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …