दिवसेंदिवस होतेय अधिक तरूण, मलायकाचे २०२२ मधील सर्वाधिक व्हायरल फोटोज

मलायका आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच सतर्क असते. नियमित योगा करणे आणि व्यायाम करणे हेच मलायकाच्या उत्तम फिगरमागील रहस्य आहे. मलायकाचे वय वाढत असले तरीही तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मात्र तिचे वय दिसून येत नाहीये. मलायकाचे लुक हे केवळ मुलांनाच नाही तर मुलींनाही आवडतात. तिचा फॅशन लुक किल्लर असून २०२२ मध्ये तिचे असे काही लुक होते ज्याने चाहत्यांना अक्षरशः घायाळ करून सोडले. आजही मलायकाची जादू कायम असून तिच्या चाहत्या वर्गामध्ये भरच पडताना दिसून येत आहे. याशिवाय योगा आणि परफेक्ट आहारामुळेच आपली ही फिगर आपण अशा पद्धतीने सांभाळू शकत असल्याचेही मलायकाने अनेक वेळा सांगितले आहे. बघूया मलायकाचे हे टॉप ५ लुक.

मलायकाचा सेन्शुअस लुक

वयाच्या ४८ व्या वर्षीही मलायका तितकीच सुंदर आहे. मलायकाचं वय वाढत नाही कमी होत चाललं आहे असंच सध्या म्हटलं जातंय. त्याचंच एक उदाहरण म्हणजे यावर्षीचा मलायकाचा एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलेला हा लुक. मलायका २० वर्षाच्या मुलाची आई अजिबात वाटत नाही. सध्या मलायका आपल्यापेक्षा १२ वर्षाने लहान असणाऱ्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. पण तिच्या अदा मात्र दिवसेंदिवस तरूणींनाही लाजवतील अशा आहेत. तिचा हा लुक पाहिला तर तिचे वय अजिबात ओळखता येणार नाही. २०२२ मध्ये मलायकाचा हा लुक खूपच व्हायरल झाला होता. तर या लुकवर खूप चर्चाही झाली होती.

हेही वाचा :  अमेरिकेत बेपत्ता झालेल्या पुण्यातील नील आचार्यचा मृत्यू; 2 दिवसांत 2 भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ

डॅझलिंग दिवा

मलायका म्हटलं की, छैय्या छैय्या आणि अशी काही आयटम साँग्ज डोळ्यासमोर उभी राहतात. पबमध्ये अनेक अशी गाणी वाजवण्यात येतात जी मलायकाने परफॉर्म केलेली आहेत. त्यामुळे डॅझलिंग दिवा अशीच मलायकाची ओळख आहे. मलायकाचा हा लुक एक प्रकारे ती बॉलीवूड दिवा असल्याचा पुरावाच आहे. कोणत्याही पार्टीसाठी हा उत्तम लुक ठरतो. पण मलायकाने घातलेला हा ड्रेस फक्त आणि फक्त मलायकासाठीच आहे असा ती कॅरी करते. त्यामुळेच तिचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. मलायकाचा हा आकर्षक लुक व्हायरल झाला नसता तरच नवल!

(वाचा – क्रॉप शर्ट घालून मलायका अर्जुन कपूरसोबत पोहचली डेटला, कातिलाना नजरेनेच सर्वांना केले घायाळ)

मनमोहक अदा

मलायका आपल्या फॅशन स्टाईलसह अदांसाठीही प्रसिद्ध आहे. कोणत्या ड्रेसवर कशा पद्धतीने पोझ द्यायची याची उत्तम जाण मलायकाला आहे आणि म्हणूनच मलायकाचे फोटो तिच्या प्रत्येक ड्रेससह अप्रतिमच येतात. मलायकाची अदा ही घायाळ करणारीच आहे. ग्लॅमरस ड्रेस आणि त्यात साजेसा ग्लॉसी मेकअप करून मलायकाने इंटरनेटचे तापमान वाढवलं आहे. मलायकाने यामध्ये घातलेल्या नीलम नेकलेसचीही खूपच चर्चा झाली.

हेही वाचा :  नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोप्पा; मेट्रो-3बाबत समोर आली मोठी अपडेट

(वाचा – वादग्रस्त लावणीक्वीन गौतमी पाटीलची फॅशनही ठरतेय सेन्सेशन, इंटरनेटवर घातलेय धुमाकूळ)

बिकिनी लुकने लावली आग

मलायका अनेक ठिकाणी प्रवास करत असते. विशेषतः सुट्टीचा आनंद घ्यायला अनेकदा मलायका मालदिव्जमध्येही जाताना दिसून आली आहे. यावर्षी मलायकाचे अनेक बिकिनी लुक दिसले असले तरीही तिचा हा बिकिनी लुक खूपच व्हायरल झाला होता. परफेक्ट टोन्ड बॉडी आणि पाण्यातील तिचा हा लुक चाहत्यांची आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारा होता. ४८ व्या वर्षीही इतकी परफेक्ट फिगर आणि ती फ्लॉन्ट करण्याची योग्य पद्धत मलायकाने उत्तम जपली आहे. त्यामुळेच तिचा हा लुक खूप व्हायरल होताना दिसला.

(वाचा – मलायका मिनी शर्ट ड्रेस व डोळ्यांवर गॉगल घालून ऐटीत बसली रिक्षात, अ‍ॅटिट्युड व स्माईलने रिक्षाचालकाला लावलं वेड)

शीर नेट लेग कट ड्रेस

पार्टीसाठी कशा पद्धतीने वेगवेगळे ड्रेस घालावे याची प्रेरणा हवी असेल तर मलायकाचे लुक परफेक्ट ठरतात. शीर नेट लेग कट ड्रेसमध्ये मलायकाचे सौंदर्य अपरंपार खुलून आले आहे. त्यात ड्युई मेकअप आणि विंग्ड आयलायनर तिचे सौंदर्य अधिक खुलविण्यास मदत करत आहे. मलायकाचा हा लुकदेखील यावर्षी खूपच व्हायरल झाला होता. डस्की स्किन आणि त्याला साजेसा मेकअप आणि तितकाच लक्षवेधी असा ड्रेस सौंदर्यात भर घालत आहे. मुळात मलायकाचे सौंदर्य हे तिच्या फिगरमुळे अधिक उठावदार दिसते असं म्हटलं तर त्यात वावगं काहीच ठरणार नाही.

हेही वाचा :  Relationship: वयापेक्षा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध करणे चुकीचं आहे का? बॉलिवूडमधल्या या जोड्या ठरल्या आदर्श

२०२२ मधील मलायकाचे हे लुक नक्कीच मनमोहक, आकर्षक आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. तर मलायका यावर्षी कोणते फॅशन लुक करणार आणि चाहत्यांना खुष करणार हे पाहावे लागेल.

(फोटो क्रेडिटः Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …