Katas Raj Temple : पाकिस्तानात ‘या’ मंदिरात शिवशंकराच्या अश्रुंपासून बनलं कुंड, जाणून घ्या महत्त्व?

Katas Raj Mandir in Pakistan: महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण लवकरच येतो आहे त्यामुळे सगळीकडेच शिवभक्तांची तयारी सुरू झाली आहे. शिवमंदिरांचा आपल्या देशात जाज्वल्य असा इतिहास आहे त्यामुळे आपल्या सर्वांनाच शिवमंदिरांप्रतीचे आकर्षण आणि कुतूहलही प्रचंड आहे. असंच एक मंदिर हे पाकिस्तानात देखील आहे. या मंदिरात पौराणिक महत्त्वही (Histortical Significance) खूप आहे. 

पाकिस्तानमधील कटास राज मंदिराच्या (Katas Raj Mandir Lord Shiva) बाबतीत अनेक पौराणिक कथा आहेत. त्यामुळे शिवभक्तांची या मंदिराप्रती आस्था आहे. 

कुठे आहे हे मंदिर? 

या मंदिराचे नाव कटास राज मंदिर असं आहे ज्याला किला कटास मंदिर म्हणूनही ओळखले जाते. चकवाल गावापासून हे मंदिर 40 किलोमीटर लांब कटस नावाच्या जागी आहे. पोटोहर पठारच्या जवळ हे मंदि आहे. 

काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्यं? 

या मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की येथे सतीनं तिचे वडिल दक्ष यांच्या यज्ञकुंडात (Sati) आत्मदहन केले होते तेव्हा शंकरदेवानं तिच्या वियोगामुळे अश्रु ढाळले होते. त्यांच्या अश्रुंपासून येथे दोन कुंड तयार झाले त्यापैंकी एका कुंडांचे नाव आहे कटाक्ष कुंड. हे कुंड आजही पाकिस्तानात आहे. तर दुसरं कुंड पुष्कर हे राजस्थानात (Rajsthan Pushkar Kund) आहेत. कटसराज मंदिराच्या परिसरात सात मंदिरे महाभारताच्या कालखंडात पांडवांनी बांधली होती. येथे पाडवांनी चार वर्षांचा वनवास भोगला होता. 

हेही वाचा :  मोठी बातमी! इम्रान खान यांच्या घऱात 30 ते 40 दहशतवादी; एकच खळबळ, पोलिसांचा संपूर्ण परिसराला घेराव

पाडवांनी येथे राहण्यासाठी सात इमारती बांधल्या होत्या. या इमारतींचेही वैशिष्ट्यं फार मोठे आहे. याच तलावाच्या काठी युधिष्ठिर आणि यक्षांचे संभाषण झाले होते, असेही म्हटले जाते. 

पाकिस्तानमध्ये श्री कटास राज मंदिर आहे. ज्याचे महत्त्वही मोठं आहे. येथे महाशिवरात्रीच्या (Mahashivratri Significance) निमित्तानं खास उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. येथे महाशिवरात्रीला तीर्थयात्री नित्यनियमानं हजेरी लावतात आणि येथील प्राचीन मंदिराच्या अमर कुंडमध्ये पवित्र स्नान करतात. 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चकवाल नावाच्या जिल्ह्यात श्री कटास राज मंदिर आहे. जिथून श्री कटास राज मंदिराची यात्रा निघणार आहे. ही यात्रा अमृतसर अटारी-वाघा बार्डरवरून 16 फेब्रुवारी म्हणजे कालपासून निघाली आहे जी 22 फेब्रुवारीला पाकिस्तानसाठी रवाना होणार आहे. श्री कटास राज तीर्थ स्थळात 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या (Mahashivratri Celebration) निमित्ताने विविध उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिराचे फोटो अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हे मंदिर आहे ज्याचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. त्यासाठी यात्रेकरू (Katas Raj Mandir Photos) येथे भेटही देत असतात. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …

Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास…; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon Updates) राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो …