लहान मुलांच ‘हे’ खाणं खाऊन २४ किलो वजन केलं कमी, कोलेस्ट्रॉलवर अशी केली मात

वजन कमी करून फिट राहणं, हा प्रत्येकाचा विचार असतो. परंतु अनेकदा कामाच्या रूटीनमध्ये आपण इतके अडकतो की ते शक्य होत नाही. हा अनुभव अनेकांचा असेल. पण आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये असणं गरजेच आहे.

असाच अनुभव रामांजनेयुलु मलमपती यांचा आहे. मलमपती यांचे वजन तब्बल 102 किलो होते. ज्यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्या निर्माण झाल्या होत्या. ऑगस्ट 2022 मध्ये, कंपनी-प्रायोजित आरोग्य तपासणी दरम्यान मलमपती यांना केवळ उच्च कोलेस्ट्रॉलचे निदान झाले नाही तर त्याला ग्रेड 2 फॅटी लिव्हर असल्याचे सांगण्यात आले. हा रामसाठी सर्वात मोठा धक्का होता. तेव्हाच रामने आपली जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेतला. वजन कमी करणे आणि निरोगी खाणे आणि नियमित चालणे सुरू केले. यासोबतच लहान मुलांना दिला जाणारा पदार्थ म्हणेज नाचणी सत्वच्या मदतीने वजन कमी केलं. अवघ्या काही महिन्यांत, तो इच्छित परिणाम साध्य करू शकला. त्याने हे कसे केले हा अनुभव नक्कीच प्रेरणादायी आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  'तू वांझ आहेस...' रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि...

टर्निंग पॉईंट

मी सुदृढ नव्हतो. कोणतीही शारीरिक हालचाली केली की मला नंतर नेहमी थकवा जाणवायचा, असं रामांजनेयुलु मलमपती सांगतो. 11 ऑगस्ट 2022 रोजी, जेव्हा मी कंपनी प्रायोजित वार्षिक आरोग्य तपासणीसाठी गेलो होतो, तेव्हा मला कळले की माझे कोलेस्ट्रॉल जास्त आहे आणि माझे वजन 25 किलोने जास्त आहे. तेव्हाच मी माझ्या जीवनशैलीत बदल करण्याचा निर्णय घेतला.

(वाचा- Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही)

​असा होता डाएट

नाश्ता: अंड्याचा पांढरा भाग, नाचणी सत्व, काकडी आणि गाजर सॅलड, सफरचंद, डाळिंब, कस्टर्ड सफरचंद.

दुपारचे जेवण: पांढरा तांदूळ एक कप, चपाती, पातळ भाजीसोबत चपाती, सॅलड, चिकन 250 ग्रॅम दर आठवड्याला 2 दिवस, पनीर आठवड्यातून एकदा.

रात्रीचे जेवण: भाज्याटाकून उपमा, फळे, डाळ सोबत ज्वारीची भाकरी, नाचणी डोसा, खजूर.

जेवणा दरम्यान: 250 मिली ताक दिवसातून 3 वेळा.

(वाचा – Kidney Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम)

वर्कआऊट

रोज सकाळी मी 1.5 तास चालतो आणि संध्याकाळी मी माझ्या दैनंदिन कामांसोबत तासभर चालतो. मलमपतीने चालण्याला दैनंदिन जीवनात खूप महत्व दिला.

हेही वाचा :  महादेवाचे आवडते बेल पान केसांच्या आणि त्वचेच्या समस्येसाठी संजीवनीच

(वाचा – Stroke Sign : स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल))

​कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या

मलमपतीने आहारात चांगल्या गोष्टींचा जसा आवर्जून समावेश केला. तसाच काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या. कोणत्या ते पाहूया.

  • आईसक्रीम
  • मिठाई
  • तळलेले पदार्थ
  • केक आणि थंड पेय

(वाचा – Natural Herbs For Thyroid : थंडीमुळे थायरॉइड बळावतो, घरच्या घरी या ५ उपयांनी मिळवा hyperthyroidism नियंत्रण))

​असे गाठले स्वतःचे ध्येय

दृढनिश्चयाने मला नेहमीच माझे ध्येय गाठण्यात मदत केली, असं मलमपती सांगतो. स्वतःला आपली उद्दिष्टे पाहण्याची गरज आहे आणि फिटनेस प्रवास प्रथम का सुरू केला हे स्वतःला विचारले पाहिजे. गोष्टी पुढे नेण्याच्या आपल्या सबबींपेक्षा आपली कारणे अधिक मजबूत असली पाहिजेत. “तुमच्या मनाला प्रशिक्षित करा, तुमचे शरीर अनुसरण करण्यास बांधील आहे”.वजन कमी करण्याच्या प्रवासात सातत्य हेच महत्त्वाचे आहे.! असा मूलमंत्र मलमपती सांगतो.

(वाचा – रिकाम्या पोटी प्या कुळथाचं पाणी, मुतखडा-ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलपासून मिळेल सुटका)

(हे आर्टिकल इंग्रजी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(टीप – प्रत्येकाचा वजन कमी करण्याचा प्रवास वेगळा असू शकतो. तुमचा देखील असाच अनुभव असेल तर तुमची वेट लॉस जर्नी आमच्यासोबत नक्की शेअर करा)

हेही वाचा :  Crying makeup पासून Dark lip liner पर्यंत, हे 2022 मधील टॉप ब्युटी ट्रेंड

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट

Dombivali MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीशण आग लागली आहे.  डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल …

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…

Vegetable Price Hike In Maharashtra: एकीकडे उन्हाचा कडाका तर एकीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा …