महादेवाचे आवडते बेल पान केसांच्या आणि त्वचेच्या समस्येसाठी संजीवनीच

शंकराच्या पिंडीवर वाहले जाणारे बेलाचे पान ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आरोग्यासाठी बेलाची पाने खूपच उपयुक्त असतात. बेलाच्या पानांचा काढा हा जून्या आजारांपासून सुटका मिळवून देण्यास फायदेशीर असतो. एवढेच नव्हे तर बेलाची पाने, फळ आणि खोड यांचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदेही आहेत. बिल्वपत्रांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोकाही बिल्वपत्रामुळे कमी होतो. तसेच ॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे सौंदर्य खुलविण्यासाठी बेलपत्र उपयोगी ठरते फक्त त्याचा वापर कसा करायचा याची माहीती असणे गरजेचे असते. (फोटो सौजन्य :- @iStock)

बेलाच्या पानांमुळे मिळते सुंदर त्वचा

बेलाच्या पानांमुळे मिळते सुंदर त्वचा

बेलाच्या पानांमध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन्स, केसांसाठी उपयुक्त ठरणारे बीटा कॅरेटीन व थायमीन यासोबतच कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन्स ए, बी आणि सी तसेच ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. बेल पत्रातील हे सर्व घटक केसांसाठी आणि त्वचेला तजेलदार करण्यासाठी उपयुक्त आहेत.

(वाचा :- क्रांती रेडकरने शेअर केला Hydra Facial चा व्हिडीओ, जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार) ​

हेही वाचा :  पटोला साडीत कोकिलाबेन अंबानींचा रॉयल रुबाब, नातीच्या आनंदासाठी आजीची लगबग

केसांसाठीही होतो बेलाचा उपयोग

केसांसाठीही होतो बेलाचा उपयोग

– हा उपाय करण्यासाठी तिळाच्या तेलात बेलफळाची साले आणि थोडा कापूर घालावा. हे तेल गरम करून घ्यावे. हे तेल केसांना लावल्यास केसांची वाढ होते.
– केस गळणे कमी होण्यासाठी बेलाचे एक पान दररोज खावे.
– बेलपानांचा रस केसांना लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते.

त्वचेवर लावा बेलपत्रांचा फेसपॅक

त्वचेवर लावा बेलपत्रांचा फेसपॅक

नितळ त्वचा मिळवण्यासाठी बेलपत्रांचा फेसपॅक अतिशय उपयुक्त ठरतो. हा लेप बनविण्यासाठी बेलाची पाने मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. साधारण दोन चमचे बेलाच्या पानांचा रस असेल तर त्यामध्ये एक चमचा मध टाका. तुम्ही यामध्ये गुलाब जल सुद्धा टाकू शकता. हे मिश्रण एकत्र करुन हा लेप चेहऱ्याला लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. या उपायामुळे त्वचा तजेलदार होते.

(वाचा :- Beauty tips : हट्टी Blackhead ला ‘या’ उपायांनी मुळासकट काढून टाका, चमकदार त्वचेसाठी एकदा नक्की वापरा) ​

बेलाच्या पानांचा असाही उपयोग

बेलाच्या पानांचा असाही उपयोग

– बेलाची पाने लिव्हरसाठी फायदेशीर असतात.
– पोटाचे दुखणे तसेच अपचनासंबंधी सर्वच तक्रारी बेलाच्या पानांनी कमी होतात.
– मधुमेहींना साखर नियंत्रित ठेवण्यासाठी बेलफळाचे चुर्ण खाण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा :  लहान मुलांच 'हे' खाणं खाऊन २४ किलो वजन केलं कमी, कोलेस्ट्रॉलवर अशी केली मात

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …