वजन घटविण्यासाठी करा जेवणात असा बदल

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायांपासून डाएटपर्यंत सर्व काही प्रयत्न करतो. मात्र तरीही बरेचदा वजन कमी होत नाही. याचे कारण म्हणजे आपण अनेक गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष. उदाहरणार्थ वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त सकाळच्या नाश्त्याकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र रात्रीच्या जेवणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. रात्रीच्या जेवणात तुम्ही काही बदल केलेत तर तुमचे वजन पटकन कमी होण्यास मदत मिळते. असे नक्की कोणते बदल आहेत ज्याचा उपयोग आपण वजन कमी करण्यासाठी करू शकते हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत.

रात्रीच्या जेवणातील पदार्थांकडे द्या लक्ष

जेव्हा तुम्ही रात्री जेवता तेव्हा आपल्या ताटात नक्की काय पदार्थ आहेत याकडे लक्ष द्या. रात्रीच्या वेळी अधिक तिखट अथवा तळलेले पदार्थ खात असाल तर ते टाळणे योग्य आहे. वजन कमी करायचे असेल तर याकडे विशेष लक्ष द्यावे. रात्री जड पदार्थ खाल्ल्यास, पचनक्रिया होणे कठीण जाते आणि त्यामुळे पोटात चरबी साठून वजन वाढू लागते. त्यामुळे तुम्ही अगदी चीट मीलदेखील करत असाल तर तो रात्री न घेता दुपारी घ्यावा. रात्रीच्या जेवणातील पदार्थांबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी.

हेही वाचा :  १५ दिवसात पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

अन्नाच्या दर्जावर करा लक्ष केंद्रित

रात्रीच्या जेवणात आपण काय खातोय याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हेल्दी पद्धतीने वेट लॉस करायचे असेल तर जेवणात हेल्दी आणि लाईट पदार्थ खाण्याकडे कल असतो. पण हलके जेवण खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर तुम्हाला पदार्थाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजेच हलका पदार्थ आहे म्हणून तो अति खाल्ला जातो. त्यामुळे कॅलरी वाढते आणि वजन कमी होण्यापेक्षा वजन वाढीला लागते. त्यामुळे आपण किती प्रमाणात खातोय याकडेही लक्ष द्या. (वाचा – Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही)

रात्रीच्या जेवणाच्या वेळेत बदल

वजन कमी करण्यासाठी जेवणाची वेळ योग्य असणे महत्त्वाचे ठरते. बरेचदा जेवल्यावर लोक लगेच झोपतात. पण त्यामुळे अन्न पचत नाही. तर काही जण आधीच जेवतात आणि दोन – तीन तासाने झोपतात. या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. झोपण्याच्या चार तास आधी जेवल्यास, रात्री अचानक भूक लागते आणि त्याचाही वजनवाढीवर परिणाम होतो. त्यामुळे जेवल्यानंतर किमान एक ते दोन तास जातील इतकाच कालावधी असावा. ८ वाजता जेवल्यास, तुम्ही १० वाजता झोपावे.

हेही वाचा :  लग्नानंतर पुरूष का होतात इतर महिलांकडे आकर्षित? समोर आलं धक्कादायक कारण, पायाखालची जमीन सरकेल

(वाचा – Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, या ५ ज्यूसने झपाट्याने कमी होईल वजन)

जेवण्याच्या आधी प्यावे सूप

हा एक अत्यंत सोपा बदल आहे. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारा बदल. रात्रीच्या जेवणापूर्वी सूप पिण्याने अनेक पोषक तत्व मिळतात. तसंच तुमचे पोट अधिक भरते आणि त्यामुळे जेवण अधिक जात नाही. म्हणजेच ओव्हरइटिंग हा प्रकार घडत नाही. यामुळे वजन घटविण्यासाठी मदत मिळते. शरीराला आवश्यक पुरेशी तत्व मिळाल्याने शरीरालाही त्रास होत नाही.

(वाचा – व्हेरिकोज वेन्सची वाढती समस्या आणि कशी घ्याल काळजी)

दुसऱ्याच्या ताटात जेऊ नका

अनेकदा आपण आपले जेवण झाल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या ताटातूनही खातो. पण असं अजिबात करू नका. दुसऱ्या कोणाहीसह जेवण शेअर करू नका. कारण आपण कमी खातोय हे दाखवून दुसऱ्याच्या ताटातील खाल्ल्याने तुमचं वजन हे वाढणारच आहे. त्यामुळे किमान स्वतःला फसवू नका. तसंच दुसऱ्याच्या ताटातून जेवल्यास, आपण नक्की किती खातोय याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे शक्यतो हे टाळा.

रात्रीच्या जेवणात हे सोपे बदल तुम्ही करून पाहा आणि त्यानंतर तुमचे वजन कमी होतंय की नाही ते पाहा. यामुळे वजन कमी करण्यास नक्कीच मदत मिळते.

हेही वाचा :  बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!

(फोटो क्रेडिटः Canva)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …

Maharastra Politics : शरद पवारांच्या भावनिक वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा खुलासा, म्हणाले ‘होय, मी 2004 पासून मी भाजपशी…’

Praful Patel Statement On Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल …