ऋजुता दिवेकरने सांगितले ऐन तारुण्यात येणाऱ्या ॲक्ने-पिंपल्सच्या समस्येवरील​​ 3 कारणे​ आणि ​उपाय

शाळेत जाणाऱ्या मुला – मुलींपासून म्हताऱ्या आजींपर्यंत आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी प्रत्येक जण आप आपल्या परीने मेहनत घेत असतं. पण वाढत्या वयात चेहऱ्यावर ॲक्ने- पिंपल्स येतात. अनेकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. त्यांवर कितीही उपाय केले तरी काहीही फायदा होत नाही. उलट बऱ्याचवेळा या उपायांचे चुकीचे परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात. यासाठीच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर आणि त्यांच्या टीमने तुमच्यासाठी काही खास उपाय आणले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते उपाय. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​किशोरवयीन मुलांना ॲक्ने- पिंपल्स येण्याची कारणं

आपण जसं जसे मोठे होतं तसं आपल्या शरीरात असंख बदल होत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर ही दिसून येतो. साधारण ११- १२ व्या वर्षी मुले- मुलींमध्ये हार्मोन्सचे असंतुलन मोठ्या प्रमाणावर बदलते. त्यामुळे शरीरातील सेबमनचे प्रमाण वाढते. त्यामुळेच चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि काही काळानी अॅक्ने येण्याची प्रक्रिया सुरु होते. जर तुम्हाला या गोष्टी नको हव्या असतील तर तुम्ही आहारात काही बदल करणे गरजेचे आहे. यासाठीच Rujuta Divekar आणि त्यांच्या टीमने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून संवाद साधला आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते सोपे उपाय. (वाचा :- आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर, Jawed Habib ने सांगितला सोपा उपाय)

हेही वाचा :  JCB चा रंग पिवळाच का असतो? 'या' मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल

​रात्रीची पुरेशी झोप

ॉआजकाल अनेक मुलं मुली रात्रभर मोबाईलमध्ये किंवा रात्रभर टीव्ही बघत बसतात. त्यामुळे झोपण्याची वेळ निश्चित नसते. या एक सवयीचा परिणाम तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच्या झोपण्याच्या वेळा निश्चित करा. ही गोष्ट केल्यास तुम्हाला आरोग्यासंबंधीत अनेक गोष्टींमध्ये फायदा होईल. (वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

​रोज एक तास व्यायाम

आज काल प्रत्येक जण खूप आळशी झाले आहेत. पण नितळ त्वचेसाठी तुम्ही रोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातून टॉक्झिन्स बाहेर पाडण्यास मदत होते. जर तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर तुम्ही मैदानी खेळसुद्धा खेळू शकता. त्याच प्रमाणे स्केटिंग, ट्रेकिंगसुद्धा करु शकता. (वाचा :- आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर, Jawed Habib ने सांगितला सोपा उपाय)

​आहारात बदल

सुंदर त्वचेसाठी व्हिटॅमिन ए आणि ईची गरज असते. यासाठी तुम्ही आहारात हिरव्या भाज्या, सुकामेव तूप, कंद यांसारख्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे तुमची त्वचा नितळ होण्यास मदत होईल. (वाचा :- Skin Infection : हिवाळ्यात ‘या’ चुकीच्या सवयींमुळे त्वचा सोलली जाते, असू शकतात गंभीर आजार)

हेही वाचा :  केळीच्या सालीपासून घरच्या घरी बनवा हा फेसमास्क, 15 दिवसात येईल चेहऱ्यावर ग्लो

​या गोष्टी टाळा

भूक लागल्यावर आपण चिप्स, कोल्ड्रिंक आणि पॅकेट फुडला महत्त्व देतो पण तसे केल्यास शरीराला नको असणाऱ्या गोष्टी तुम्ही शरीराला देता. त्यामुळे शक्यतो चिप्स, कोल्ड्रिंक, बिस्किटे, एनर्जी ड्रिंक, पॅकेट फुड या गोष्टी टाळा. (वाचा :- जगात सर्वात मोठे ओठ असणारी स्त्री! ७.५९ लाखांचा खर्च गेला वाया, आकार इतका की श्वासही घेता येईना)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …