JCB चा रंग पिवळाच का असतो? ‘या’ मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल

JCB’s real name and why it has Yellow colour : कुठे बांधकाम होत असेल किंवा कुठे रस्त्याचं काम सुरु असेल तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या मशीन पाहायला मिळतात. पण सगळ्यात कॉमन आणि जी कोणत्याही कामासाठी वापरण्यात येणारी मशीन म्हणजे जेसीबी. पिवळ्या रंगाची असणारी ही मशीन इतकी मोठी असते की काही क्षणात ही कोणत्याही मोठ्या इमारती देखील पाडू शकते. कंस्ट्रकश्न साइट्सवर देखील जेसीबी मशीन खोदकाम करत असल्याचं आपण पाहतो. या मशीनचा रंग पिवळा असतो. फक्त ही एकच मशीन नाही तर याशिवाय बुलडोजर एक मशीन आहे. जिचा वापर हा रस्ता बनवण्यासाठी करण्यात येतो. या मशीनचा रंग देखील पिवळा असतो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की अशा काही मशीन्स आहेत त्यांचा रंग पिवळा का असतो? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया. 

जेव्हा पासून आपण किंवा मग आपल्या घरात असलेले मोठे या मशीन्स पाहत आहेत त्यांचा रंग हा पिवळाच असतो. मात्र, इतर गाड्यांप्रमाणे त्यांचा रंग हा कधीच काळा, निळा, लाल का नसतो? असा तुम्हाला प्रश्न पडला का? तर महत्त्वाचं म्हणजे कधी काळी या गाड्यांचा रंग हा देखील लाल आणि पांढरा होता. पण काही गोष्टी लक्षात घेता यांचा रंग हा पिवळा करण्यात आला. दरम्यान, जेव्हा लाल आणि पांढऱ्या रंगाची जेसीबी मशीन ही कंस्ट्रक्शन साइट्सवर काम करायची तेव्हा लांबून त्या स्पष्ट दिसायच्या नाही. रात्री तर पांढऱ्या आणि लाल रंगाच्या मशीन या दिसायच्याच नाही. मग कंपनीनं जेसीबीचा रंग पिवळा केला, जेणेकरून लांबून त्या दिसू शकतील. पिवळा रंगाच्या असल्यानं त्या रात्री देखील स्पष्ट दिसू लागल्या होत्या. 

हेही वाचा :  ED Raid In Maharashtra : दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई

जेसीबी हे नाव कसं मिळालं?

जेसीबी हे मशीनचं खरं नाव नाही तर ती मशीन बनवणाऱ्याचं नाव आहे.  जेसीबी हे ती मशीन बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे. या जोसेफ सिरिल बामफोर्ड एक्सावेटर्स असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीची स्थापना ही 1945 जोसेफ सिरिल बामफोर्ड यांनी केली होती. कंपनीच्या नावानं आता या मशीनला ओळख मिळाली आहे. 

काय आहे या मशीनचं खरं नाव? 

ज्या मशीनला सगळे जेसीबी असं बोलतात त्याचं खरं नाव हे ‘बॅकहो लोडर’ असं आहे. भारत, ब्रिटेन आणि आयरलॅन्डमध्ये जेसीबी शब्दाचा वापर साधारणपणे खोदकाम करणाऱ्यांसाठी वापरण्यात येतो. दरम्यान, आजही हा एक ट्रेडमार्क म्हणूनतं वापरण्यात येतो. 

हेही वाचा : ‘लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला ‘सेक्सी’ शब्दाचा अर्थ!

जेसीबी कंपनीनं 1945 मध्ये पहिलं ‘बॅकहो लोडर’ बनवलं होतं. त्याआधी 1953 मध्ये त्याचं एक मॉडल बनवण्यात आलं होतं. मात्र, या मॉडलमध्ये बदल करण्यात आले होते. दरम्यान, जेव्हा  1953 मध्ये जेव्हा त्याचे मॉडेल बनवण्यात आले होते. तेव्हा त्या मशीनचा रंग हा निळा आणि लाल ठेवण्यात आला होता. त्यानंतर हे रंग बदलून लाल आणि पांढरा करण्यात आला होता. सगळ्यात शेवटी सुरक्षा पाहता या मशीनचा रंग पिवळा करण्यात आला होता. 

हेही वाचा :  Computer Shortcut Keys: कॉम्प्युटर व लॅपटॉपवर काम करताना ‘या’ शॉर्टकट कीचा होईल उपयोग, जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …