मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचं पथक सागर बंगल्यावर दाखल | Mumbai Cyber Police record statement of Devendra Fadnavis at his residence in the transfer posting case


चौकशीसाठी आज पोलिसांचं एक पथक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचलंय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. आणि त्यांना बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून आपण पोलीस स्टेशनला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी आपल्याला फोन करून स्वत: घरी येऊन जबाब नोंदवणार असल्याचं म्हटलंय, अशी माहिती दिली होती. त्यानुसार, आज पोलिसांचं एक पथक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचलंय.

पोलीस चौकशीसाठी आल्याने फडणीसांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सागर बंगल्याबाहेर हजर होते. तर, नितेश राणे देखील सागर बंगल्यावर होते. देवेंद्र फडणवीसांच्या पोलीस चौकशीवरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तुम्ही जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल, तेवढं जास्त आम्ही तोंड उघडू, असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, अद्याप तरी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवरून भाजपा नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, ही चौकशी संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आणि चौकशीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous शेतकऱ्यांनी भरलेल्या वीजबिलांतून २८४१ कोटींचा निधी यंत्रणा सक्षमीकरणासाठी; थकबाकीत ५० टक्के सवलतीची योजना ३१ मार्चपर्यंतच | 2841 crore from electricity bills paid farmers system empowerment 50percent discount plan on arrears
Next “आता दुर्योधन-दु:शासनही म्हणत असतील, रिश्ते में तो ये सरकार…”, फडणवीसांना नोटीस प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा! | bjp leader sudhir mungantiwar slams mah govt on notice to devendra fadnavis

Check Also

‘या’ 5 कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण, जाणून घ्या आता काय करावे? – Lets Talk

‘या’ 5 कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण, जाणून घ्या आता काय करावे?   अमेरिकेत आलेल्या …

“मनमोहन सिंग सरकारच्या काळात…”; ‘प्रोजेक्ट चीता’वर काँग्रेसने ठोकला दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या वाढदिवशीच म्हणजे शनिवारी आफ्रिकन देश नामिबियातून चित्ता आणण्याची तयारी …