Beast Release Date : विजय थलापतीचा ‘बीस्ट’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Beast Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) ‘बीस्ट’ (Beast) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 2022 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक आहे.  ‘बीस्ट’ सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.  ‘बीस्ट’ सिनेमा 13 एप्रिलला रिलीज होणार आहे. 

‘बीस्ट’ सिनेमा आधी 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण ‘KGF2’च्या प्रदर्शनामुळे या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘बीस्ट’ सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये विजय थलापतीच्या हातात बंदूक असून तो अत्यंत आक्रमक लूकमध्ये दिसत आहे.




नेल्सन दिलीप दिग्दर्शित ‘बीस्ट’ सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. ‘बीस्ट’ सिनेमात विजय थलापतीसह पूजा हेगडे, सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

संबंधित बातम्या

Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर ‘गोदावरी’ आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!

Oscars 2022 Live Streaming : सिनेप्रेमींना 94 वा ‘ऑस्कर पुरस्कार’सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या..

Amol Kolhe : पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला… डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  शूटिंगदरम्यान पल्लवी जोशींना दुखापत झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे ट्वीट

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …