17 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर केसच केस, वेअरवॉल्फ सिंड्रोमने ग्रस्त

सध्या दररोज नव नवीन आजार आपल्या समोर येत आहेत. असाच एक आजार म्हणजे ‘वेअरवोल्फ सिंड्रोम’ (Werewolf Syndrome) मध्य प्रदेशातील नंदलेटा गावामध्ये ललित पाटीदार या मुलाला एका विचित्र आजाराचा बळी बनला आहे. या १७ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर भरपूर केस वाढले आहेत. या आजारामुळे त्याचा चेहरा अगदी एखादया वानराप्रमाणे दिसत आहे. या आजारामध्ये या १७ वर्षीय मुलाच्या शरीरावर अंगभर केस वाढले आहेत. करोडो व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला हा आजार होतो. ललितला पाहून हा कोणाला चावेल की काय अशी भिती त्याच्या मित्रांच्या मनात निर्माण झाली आहे. फोर्टिस हॉस्पिटल, नोएडा येथील त्वचारोग विशेषज्ञ डॉ. ओशिन अग्रवाल यांच्या मते, हा दुर्मिळ आजार मधल्या युगापासून केवळ ५० लोकांमध्ये आढळून आला आहे. (फोटो सौजन्य : ET Times )

​नक्की काय आहे आजार

ललित हा प्रत्यक्षात वेअरवॉल्फ सिंड्रोम नावाच्या विचित्र आजाराचा बळी आहे. जेव्हा तो सहा वर्षांचा होता तेव्हा त्याच्यावर प्रथम हायपरट्रिकोसिसचा उपचार करण्यात आला. हायपरट्रिकोसिस ही एक असामान्य स्थिती आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीरावर जाड केस वाढतात. हा रोग इतका दुर्मिळ आहे की मध्ययुगापासून अशी केवळ 50 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा :  'पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का'; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं

​वेअरवॉल्फ सिंड्रोम म्हणजे काय?

वेअरवॉल्फ सिंड्रोमला हायपरट्रिकोसिस असेही म्हणतात. हा आजार स्त्री किंवा पुरुष कोणालाही होऊ शकतो. या आजारात शरीरावर केसांची असामान्य वाढ होते. विशेषतः चेहरा केसांनी झाकलेला असतो. काही वेळा या केसांचे ठिपकेही शरीरावर तयार होऊ लागतात. बाळाच्या जन्मापासून त्याच्या त्वचेवर असे डाग दिसायला लागतात. (वाचा :- आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर, Jawed Habib ने सांगितला सोपा उपाय)

​मित्र लांबच राहतात

मित्र लांबच राहतात

ललितच्या शरीरावर दाट केस आहेत. त्याचे वर्गमित्र त्याला मंकी बॉय (monkey boy) म्हणतात आणि त्याच्या जवळ जायला घाबरतात. बारावीत शिकणाऱ्या ललितचे वडील शेतकरी आहेत. वडिलांना शेतीच्या कामातही मदत करतो. जन्मापासूनच त्याच्या अंगावर केस असल्याचे त्याने सांगितले. जन्मानंतर लगेचच डॉक्टरांनी तिचे केस मुंडण करून काढले होते. पण जेव्हा त्याचे वय 6 वर्षांचे झाले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वाढलेल्या केसांना पाहून सर्वच जण घाबरायला लागले.

​ललितला त्याच्या स्थितीबद्दल खेद

ललितला त्याच्या स्थितीबद्दल खेद नाही. याउलट, तो लाखात एक आहे हे समजून घेणं गरजेच आहे. आणि हा विश्वास त्याच्यामध्ये आहे. हा विश्वासच त्याचा आयुष्यात पुढे घेऊन जावू शकतो. जेव्हा त्याला वाटते त्याचे केस खूप वाढले आहेत तेव्हा तो त्याचे केस कापून टाकतो. (वाचा :- नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव यांनी दिला जालिम उपाय, महिन्याभरात येईल झटपट रिझल्ट)

हेही वाचा :  'राणेंना ताटावरुन अटक केली, 80 लाख खर्च करुन कंगणा..'; शिंदेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

​आजारावर उपाय

ललीतच्या या आजारावर आजवर कायम स्वरुपाचा ईलाज मिळाला नाही. पण या आजारावर उपचार करण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस आणि लेसर शस्त्रक्रिया देखील वापरल्या जाऊ शकतात. यामुळे ललितला लहानपणापासूनच एकटे राहावे लागते, कारण इतर मुले त्याला बघायला घाबरतात. (वाचा :- नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव यांनी दिला जालिम उपाय, महिन्याभरात येईल झटपट रिझल्ट)

​वेअरवॉल्फ सिंड्रोम होण्यामागचे कारण काय आहे?

  • वेअरवॉल्फ सिंड्रोमच्या कारणांमध्ये एंड्रोजेनिक स्टिरॉइड्स आणि कुपोषण यांचा समावेश होतो.
  • काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही हा आजार होऊ शकतो. याशिवाय हायपरट्रिकोसिस जीन्स (Hypertrichosis Genes) पुन्हा सक्रिय झाल्यामुळेही हा आजार होऊ शकतो.
  • या आजारात, गर्भाच्या विकासासोबत जीन्स बंद होतात. त्याच प्रमाणे अनुवंशतेही हा आजार होऊ शकतो. (वाचा :- थंडीच्या दिवसात Dry Scalp आणि Dandruff पासून वाचण्यासाठी पुरुषांनो या 8 सोप्या घरगुती उपायांचा वापर करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …