न्यूझीलंडविरुद्ध ‘कुल्चा’ जोडी मैदानात,उमरानच्या जागी चहलला संधी,कुलदीपही संघात, पाहा अंतिम 11

India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या टी20 सामन्याला लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) सुरुवात झाली आहे. टॉस जिंकत न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता न्यूझीलंडने पहिल्या टी20 मधील संघच मैदानात उतरवला आहे. तर भारतीय संघानं मात्र एक महत्त्वाचा बदल केला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) विश्रांती देत युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संघात संधी देण्यात आली आहे.

उमरानने पहिल्या सामन्यात बऱ्याच धावा दिल्या होत्या. केवळ एकाच षटकात त्याला 16 रन पडले होते. त्यामुळे आज त्याला विश्रांती दिली आहे. तसंच खेळपट्टीवर फिरकीपटू विशेषत: किवी संघाविरुद्ध अधिक फायदेशीर असल्यानं आणखी एका फिरकीपटूला भारतीय संघानं (Team India) मैदानात उतरवलं आहे. विशेष म्हणजे चहलसह कुलदीपही (Kuldeep Yadav) मैदानात असल्यानं भारताची प्रसिद्ध फिरकीपटूंची जोडी ‘कुल्चा’ मैदानात उतरली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया…

हेही वाचा :  निर्णायक टी20 मध्ये नाणेफेक भारतानं जिंकली, प्रथम फलंदाजीचा करण्याचा घेतला निर्णय

भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग

न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर


भारतासाठी ‘करो या मरो’चा सामना

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना भारतासाठी करो किंवा मरो असा असणार आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर मालिका त्यांच्या हातून निघून जाईल. या मालिकेत किवी संघ 1-0 ने पुढे आहे. भारतीय संघाने गेल्या 10 वर्षांपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावलेला नाही. भारताने 2012 साली न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर शेवटची टी-20 मालिका गमावली होती. त्यानंतर किवींनी दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …