What to Avoid After Coffee : कॉफीनंतर ही ८ औषधे कटाक्षाने टाळा, नाहीतर डोक्यावर राहिल मृत्यूची टांगती तलवार

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफी-चहाने होते. या गरम पेयानंतरच आपण अन्न किंवा औषध खातो. पण तुम्हाला माहित आहे का की, कॉफीनंतर काही औषधे विष बनतात. या औषधांमध्ये ताप, खोकला, मधुमेह, रक्तदाब, रक्त पातळ करणाऱ्या सामान्य औषधांचा समावेश आहे.

कॉफी आणि चहा नंतर काय खाऊ नये?
कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते आणि ते चहामध्ये कमी असते. हे कॅफिन काही औषधांवर प्रतिक्रिया देते आणि दुष्परिणाम दर्शवू लागते. ताप, खोकला आणि सर्दी यांसारखी येथे सांगितलेली 8 औषधे तुम्ही घेत असाल तर खूप काळजी घ्या. या औषधांच्या आधी आणि अगदी नंतरही कटाक्षाने चहा किंवा कॉफी टाळा. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​सर्दी-खोकल्याचं औषध

एफेड्रिन हे औषध एक उत्तेजक आहे, जे मज्जासंस्थेला उत्तेजित करते. खोकला आणि सर्दीमध्ये छातीतील रक्तसंचय दूर करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. हे औषध कॉफीच्या आधी किंवा नंतर घेऊ नये. कारण, चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफीन देखील अशाच प्रकारे कार्य करते. MyoClinic च्या मते, या दोघांच्या मिश्रणामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि दौरे होऊ शकतात.

हेही वाचा :  रोज सकाळी प्याल धणे पाणी तर थायरॉईडसह अनेक आजारांवर करू शकाल मात

(वाचा – ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल)

​रक्त पातळ करण्याचे औषध

रक्त पातळ करण्यासाठी अॅस्पिरिन, आयबुप्रोफेन, पॅरासिटामॉल यांसारखी औषधे दिली जातात. ताप कमी करण्यासाठी अनेक डॉक्टर ऍस्पिरिनची शिफारस देखील करतात. कॉफी पिण्याच्या वेळेच्या आसपास अशी औषधे घेऊ नयेत. कारण, कॅफिन देखील रक्त पातळ करते आणि या मिश्रणामुळे जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.

(वाचा – Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला)

​डायबिटिजचे औषध

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेत असाल तर त्यासोबत चहा-कॉफीचे सेवन करू नका. कारण, कॉफी-टी प्यायल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि त्यामुळे मधुमेहविरोधी औषधांचा विपरीत परिणाम दिसून येतो. त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

(वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

​फुफ्फुसांच्या आजारावरील औषध

दमा, श्वास लागणे, ब्राँकायटिस यांसारख्या फुफ्फुसाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर थिओफिलिन औषधाची शिफारस करतात. तुम्हाला जर श्वसनाचा त्रास असेल तर या औषधांसोबत किंवा त्याआधी किंवा नंतर कॉफी घेऊ नका. कारण, कॅफीन आणि या औषधाचा परिणाम सारखाच आहे आणि MyoClinic नुसार, यामुळे मळमळ, अस्वस्थता यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा :  कूलर देईल एसीसारखी हवा, फक्त या ५ टिप्स फॉलो करा

(वाचा – शरीरातलं रक्त, पाणी सुकवून टाकतात हे १५ पदार्थ, यामुळेच कमी वयात होतात हार्ट अटॅक-कॅन्सरसारखे जीवघेणे आजार)

​गर्भनिरोधक औषध

जर एखादी महिला गर्भनिरोधक औषध घेत असेल, तर कॉफी पिण्यापूर्वी किंवा नंतर लगेच घेऊ नका. कारण, ही औषधे शरीरातील कॅफिनचे विघटन कमी करतात, ज्यामुळे कॉफी प्यायल्यानंतर चक्कर येणे, धडधडणे आणि इतर दुष्परिणाम होऊ शकतात.

(वाचा – सुपारीसारखा दिसणारा हा पदार्थ नसांमधील ब्लड शुगर -बीपीला पोहोचवेल ठिकाण्यावर, शरीर होईल एका झटक्यात निरोगी))

​या औषधांच सेवन टाळावे

वर नमूद केलेल्या औषधांव्यतिरिक्त, तुम्ही कॉफी किंवा चहाच्या आसपास इतर काही औषधे देखील घेऊ नये. यामध्ये नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे. मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे आणि हार्मोन वाढवणारी औषधे यांचा समावेश आहे.

(वाचा – रक्तात ‘हे’ प्रोटीन वाढल्यामुळे पुरुषांना होतो Prostate Cancer, शरीरातल्या या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका)

​कॉफी घेतल्यानंतर किती वेळांनी घ्यावी गोळी?

कॉफीमधील कॅफीन आणि टॅनिन हे औषध वापरण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करतात. WebMD नुसार, तुम्ही कॉफी किंवा चहा प्यायल्यानंतर किमान 1 तास आधी आणि 2 तास कोणतीही औषधे घेऊ नये.

हेही वाचा :  महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

(वाचा – Cirrhosis Symptoms : सायलेंट किलर आहे Liver चा हा आजार, लास्ट स्टेजमध्ये दिसतात लक्षणे, तात्काळ सोडा ही ५ कामे)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …