कुंग फू पांड्या टी20 संघाचं भविष्य, कर्णधारपदाचं शिवधनुष्य पांड्या पेलणार का?

Hardik Pandya Team India Captain : आता नुकताच टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) पार पडला, सुरुवातीपासून दमदार कामगिरी करुनही सेमीफायनलमध्ये (IND vs ENG) इंग्लंडकडून दारुण पराभूत झाल्यामुळं भारत स्पर्धेबाहेर झाला. ज्यानंतर सर्वच भारतीय कमालीचे निराश झाले. असो खेळ म्हटल्यावर हार जीत होणारच पण पराभवातून काहीतरी शिकलं तरच भविष्यात फायदा होणार हे नक्की… त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकपसाठी  भात काय बदल करणार हेपण तितकच महत्त्वाचं आहे. त्यात अनेकांकडून युवांना संधी द्यायला हवी आणि नेतृत्त्वही बदलायला हवं अशी मागणी होत असताना भारताचा स्टँड इन कॅप्टन हार्दिक (Hardik Pandya) योग्य पर्याय आहे का? याबद्दल जाणून घेऊ… 

तर आयर्लंडविरुद्धच्या दौऱ्यात हार्दिक पहिल्यांदा टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन झाला होता, नंतर आता न्यूझीलंड दौऱ्यातही टी20 संघाची धुरा त्याच्याकडेच आहे. अशामध्ये तोच आता टी20 संघाचं भविष्य आहे का? अशी चर्चा होतीय. दिग्गज भारतीय क्रिकेटर्सनी तर पांड्या इज राईट ऑप्शन असं थेट म्हटलंय. यात वीवीएस लक्ष्मण, रवी शास्त्री, सुनील गावस्कर अशा दिग्गजांचा समावेश आहे. तर हार्दिक योग्य कर्णधार आहे यासाठी काही खास मुद्दे आहेत ते जाणून घेऊ…

हेही वाचा :  कोहली, सुर्यकुमार संघात परतल्यानंतर श्रेयसनं कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला यावं? गावस्कर म्हणाले

1. टी20 सारख्या तडकाफडकी फॉर्मेटमध्ये कॅप्टनही तसाच तडकाफडकी असायला हवा. त्यामुळे पांड्याची तडफदार खेळी एक कर्णधाराला अगदी साजेशी आहे.

2. हार्दिक स्वत: एक अगदी मस्तमौला खेळाडू आहे. त्यामुळं संघात तो असताना आपोआपच खेळीमेळीचं वातावरण असतं. सर्व खेळाडूंसोबतही त्याची मस्ट ट्यूनिंग असल्यानं एक टीमचं नेतृत्त्व म्हणून तो बेस्ट मस्त ऑप्शन आहे.

Reels

3. पांड्याची आणखी एक खूबी म्हणजे कोणत्याही प्रसंगी धीर न सोडणं, आता पांड्याचा स्वभावच अगदी बेधडक असल्यानं कितीही टेन्शनवाली मॅच असूनदे तो अगदी चिल असतो. वर्ल्डकपमध्येतर कितीवेळा त्यानं हे दाखवलं. त्याआधी आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धही शेवटच्या बॉलवर सिक्स मारताना त्यानं अगदी तेरा भाई संभाल लेगा वाला कार्तिकला दिलेला लूकही लक्षात असेलचं. आताही इंग्लंडविरुद्ध आपण सेमीफायनल हारलो, पण अखेरपर्यंत हार्दिक टाळ्या वाजवून टीमचा आत्मविश्वास वाढवत होता, हे आपण पाहिलं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडणारा असाच कर्णधार एक आदर्शवादी कर्णधार असतो.  

4. आणखी एक कारण म्हणाल, तर कर्णधार रोहितवर असणारा कॅप्टन्सीचं बर्डन कोणीतरी हलकं करायलाच हवं. भारत पहिल्यापासून तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कॅप्टन वापरतो. ज्यामुळे त्या खेळाडूवर परिणामी संघावर फारच ताण येतो. कोहलीच्या बाबतीत झालेली ही चूक टाळण्यासाठी रोहितला कसोटी आणि वन डेची जबाबदारी देऊन टी20 साठी पांड्याला जबाबदारी देणंच योग्य आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

हेही वाचा :  आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी बीसीसीआय अॅक्शनमोडमध्ये; शॉर्टलिस्ट केलेले 20 संभावित खेळाडू

5. आता लास्ट बट नॉट लिस्ट मुद्दा म्हणजे पांड्याची अष्टपैलू खेळी. आता क्रिकेटर म्हटलं की त्याच्याकडून चांगल्या बॅटिंगची, बॉलिंगची आणि सोबत फिल्डींगची अपेक्षा संघासह चाहत्यांना असते, पण या तिन्ही कसोट्यांवर खरे उतरणारे खेळाडू काहीच असतात, त्यातीलच एक म्हणजे हार्दिक, त्यामुळं कर्णधार म्हणून कोणत्याही कठीण सिच्यवेशन मध्ये संघासाठी हार्दिक धावून जाऊ शकतो आणि वेळप्रसंगी बॅट, बॉल अशा दोन्ही सामना पलटवू शकतो.

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …