Abdul Sattar Education Details: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार कितवी शिकलेयत? जाणून घ्या

Abdul Sattar Education Details: राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक बाबी सर्वांना माहिती आहेत. दरम्यान आपण त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

अब्दुल सत्तार यांचा जन्म १ जानेवारी १९६५ रोजी एका छोट्या गावात झाला. एका लहान आणि गरीब कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. अब्दुल सत्तार यांचे वडील मजूर म्हणून काम करत. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. वेळप्रसंगी अब्दुल सत्तार यांना देखील इतर कामे करुन शिक्षण पूर्ण करावे लागले. मोठा भाऊ अब्दुल गफ्फार यांच्यासोबत मिळून लहान सायकल दुकानाचा व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला होता. दरम्यान हळुहळू त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत गेले.

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीचा योग ट्रेनर ते अभिनय असा प्रवास, कितवी शिकलीय? जाणून घ्या

धीरुभाई अंबानी स्कूलच्या मालकीण Nita Ambani कितवी शिकल्या? ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
अब्दुल सत्तार यांना चार भाऊ असून चार मुलांपैकी ते तिसरे आहेत.अब्दुल सत्तार यांनी आपले प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केले. यानंतर उच्च माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण त्यांनी सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून पूर्ण केले. येथे त्यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतले.

हेही वाचा :  जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

अब्दुल सत्तार यांना शालेय जीवनापासून राजकारणाची आवड आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये त्यांच्या नेतृत्व गुणांना बहार मिळाली. शाळेतील मॉनिटर आणि कॉलेजमधील प्रतिनिधी (CR) ची निवडणूक त्यांनी जिंकली. दरम्यान १९९८४ मध्ये सिल्लोडच्या ग्रामपंचायतीची निवडणूक त्यांनी जिंकली होती.

अब्दुल सत्तार यांना लहानपणापासूनच नेमबाजी, कबड्डी, खो-खो, क्रिकेट या खेळाव्यतिरिक्त चेंडू फेकणे, लांब उडी, उंच उडी आदी खेळांमध्ये वैयक्तिक रस आहे. खेळामुळे राजकारण आणि नेतृत्व हे गुण त्यांच्यात रुजले. १ जानेवारी १९९० रोजी सिल्लोड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले. नगरपरिषदेत प्रशासक असल्याने जनतेची कामे करण्यासाठी त्यांना प्रशासक मिळाले. अब्दुल सत्तार यांच्यामागे कोणताही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी आपल्या राजकारणात सातत्याने यश मिळवून सर्वांना प्रभावित केले.

वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडले, समंथा प्रभूबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …