Ayushman Bharat : 5 लाखांपर्यंतचा इलाज खर्च, सोबत मिळतील ‘या’ सुविधा; कसा घ्याल आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

Ayushman Bharat Yojana : भारत सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. म्हणूनच नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. देशातील नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी या विविध सरकारी योजना आहेत. यामाध्यमातूम सर्वसामान्यांना पेन्शन, आरोग्य आणि गुंतवणुकीसंदर्भात लाभ मिळू शकतो. आज या बातमीमधून अशा एका योजनेबाबत माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्हाला वर्षाला पाच लाखांपर्यंतच्या फ्री इलाज खर्च ( Free healthcare)  देण्यात येतो. एवढंच नाही तर तुम्हाला या योजनेमधील इतरही विविध सुविधा मिळतात. कोणत्या आहेत या सुविधा, कोणती आहे ही योजना? सविस्तर जाणून घेऊया.   

आयुष्यमान भारत नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन

ही योजना म्हणजेच आयुष्यमान भारत नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन ( Ayushman Bharat – National health Protection Mission ) आहे. या अंतर्गत गरिबांना दरवर्षी पाच लाखांचा विमा कव्हर मिळतो. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबियांना आयुष्यमान  भारत योजनेचा लाभ देण्यात येतो. भारतातील विविध भागातून नागरिक या योजनेसाठी अर्ज देत आहेत.2018 मध्ये भारत सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. सरकारने ही योजना विविध आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने सुरु केली आहे. 

हेही वाचा :  Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

हेही वाचा – सर्दीत कशी घ्याल ओठांची काळजी? वापरा ‘या’ घरगुती टीप्स…

 

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा मिळतात? 

पंतप्रधान आयुष्यमान  भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया ( Surgery ), तपासण्या ( Medical Check Up ), औषधांच्या पैशांसोबत 1350 मेडिकल पॅकेजमधील सुविधा प्रदान केल्या जातात. या माध्यमातून केंद्राकडून थेट राज्य सरकारच्या एस्क्रो खात्यामध्ये पैशांची ट्रान्स्फर केली जाते. सोबतच नीती आयोगासोबतच्या  ( NIti Ayog ) भागीदारीने एक मजबूत आणि स्केलेबल इंटर ऑपरेटेबल IT प्लॅटफॉम सुरु करण्यात आलेला आहे. यामाध्यमातून पेपरलेस आणि कॅशलेस व्यवहार पार पडण्यास मदत होते. 

योजनेचा फायदा घेण्यासाठी कसा कराल अर्ज  

जर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र ठरत असाल आणि तुम्हाला मोफत इलाजाची ( Free Medical Treatment) सुविधा हवी असेल तर तुम्ही तात्काळ या योजनेमध्ये गुंतवणूक करू  शकतात. या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या जनसेवा केंद्रात ( Janseva Center)  जावं लागेल. तिथे तुम्ही यासाठीचा अर्ज देऊ शकतात.

High cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुमच्या त्वचेवर होतात ‘हे’ 3 बदल!

अर्ज दिल्यावर पुढे काय? 

अर्ज दखल केल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाते. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. यानंतर एजंटमार्फत तुमचं या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं जातं 

हेही वाचा :  साई रिसॉर्टच्या तोडकामाला स्थगिती, अनिल परब यांचा किरीट सोमय्यांना सवाल

कोणती कागदपत्रे जोडावी लागतात?

या स्कीममध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, रहिवासी दाखला जोडावा लागतो. तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज रद्दही होऊ शकतो. 

Ayushman Bharat National health Protection Mission full scheme details



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …