HSC Exam 2022: बारावीच्या परीक्षा उद्यापासून, विद्यार्थ्यांना ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

HSC Exam 2022: महाराष्ट्र बोर्डाच्या ( Maharashtra Board, MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Higher Secondary Certificate, HSC)परीक्षा उद्यापासून म्हणजेच ०४ मार्च २०२२ पासून सुरु होत आहे. एचएससी म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यानुसार सकाळी १०.३० ते २ आणि दुपारी ३ ते ६.३० या वेळेत परीक्षा होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी साधारण १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर करोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य आहे. याशिवाय प्रवेशपत्रासोबत फेस मास्क, हँड सॅनिटायझर सोबत ठेवणे गरजेचे आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या ३० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही.

प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

हेही वाचा :  Gate Answer Key 2022: गेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील

SEBI मध्ये विविध पदांची भरती, थेट लिंकवरून पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा
लेखी आणि तोंडी परीक्षा कधी?
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे, तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (Written HSC Exam)ही ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ( SSC Written Exam) १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.

SSC and HSC Exam 2022 Date Announced: दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीअखेर
बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

MPSC अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या
बारावीच्या परीक्षेतीली अर्धमागधी (१६) या विषयाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अर्धमागधी (१६) विषयाची परीक्षा ७ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार होती. हा पेपर आता सुधारित वेळेनुसार, ८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे.

हेही वाचा :  Munmun Dutta Education: जेठालालची क्रश 'बबीता' कितवी शिकलीय माहितेय का?

HSC Exam 2022: बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
बारावीच्या लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील या अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

IBM Recruitment 2022: इंडियन ब्युरो माइन्समध्ये विविध पदांची भरती
Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …